Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 37:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 “परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, यहूदाच्या राजाने तुम्हांला माझ्याकडे विचारण्यास पाठवले आहे, तर त्याला सांगा, पाहा, फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे ते मिसरास स्वदेशी परत जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 “परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, तुम्ही यहूदाच्या राजाला हे सांगा, कारण माझ्यापासून सल्ला घेण्यासाठी तुम्हास माझ्याकडे पाठविले आहे, पाहा, फारोचे सैन्य, तुम्हास मदत करण्यासाठी आले, त्यांना स्वतःच्या मिसर देशात परत जावे लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 37:7
22 Iomraidhean Croise  

तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्‍न करायला पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा : इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,


मिसर देशाचा राजा कधी आपला देश सोडून बाहेर पडला नाही, कारण मिसर देशाच्या नाल्यापासून महानद फरात येथवर जो सर्व मुलूख मिसरी राजाचा होता तो बाबेलच्या राजाने काबीज केला होता.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.


पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात.


मिसर देशाच्या वाटेस लागून नील नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन? अश्शूर देशाच्या वाटेस लागून फरात नदीचे पाणी पिण्याचे तुला काय प्रयोजन?


आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.


तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.


सिद्कीया राजाने मल्कीयाचा पुत्र पशहूर व मासेचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मयाकडे पाठवून सांगितले,


“आमच्याकरता परमेश्वराला प्रश्‍न कर; बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर आमच्याबरोबर लढाई करीत आहे. तो आमच्यापासून निघून जावा म्हणून परमेश्वर कदाचित आपल्या सर्व अद्भुत कृतींना अनुसरून आमच्याशी वर्तेल काय? असे विचार;”


तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”


त्या समयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले; ही वार्ता ऐकून यरुशलेमेस वेढा घालणारे खास्दी यरुशलेम सोडून गेले.


तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले ते असे :


यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसांत आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करते; जुलूम करणार्‍याच्या हाती तिचे लोक लागले तेव्हा तिला कोणी साहाय्यकर्ता नव्हता; तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली.


आमचे डोळे निरर्थक साहाय्याची वाट पाहून शिणले आहेत; आम्ही वाट पाहत असता, साहाय्य करायला असमर्थ अशा राष्ट्राची वाट पाहिली.


जेव्हा पुष्कळांचा फडशा उडवण्यासाठी शत्रू मोर्चे लावतील व बुरूज बांधतील तेव्हा युद्धप्रसंगी फारोला मोठे सैन्य व बहुत लोक बरोबर घेऊन त्याची कुमक करता येणार नाही.


ते ह्यापुढे इस्राएल घराण्याला आधार होणार नाहीत; त्यांच्याकडे त्यांचे मन गेले तर त्यांना त्यांच्या पातकाचे स्मरण होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी प्रभू परमेश्वर आहे.”


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मिसरी राजा फारो ह्याच्याविरुद्ध आहे; त्याचा शाबूत व मोडका असे दोन्ही हात मी तोडून टाकीन, त्याच्या हातातून तलवार गळेल असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan