Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 37:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परंतु त्याने, त्याच्या सेवकांनी व देशाच्या लोकांनी, यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने परमेश्वराने सांगितली होती ती ऐकली नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पण सिद्कीया, त्याच्या सेवकांनी व यहूदा देशाच्या लोकांनी परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जी वचने सांगितली होती ती त्यांनी ऐकली नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेह यिर्मयाह संदेष्ट्याद्वारे जी वचने सांगत होते, त्याकडे सिद्कीयाह राजा, त्याचे सेवेकरी व देशातील लोक यापैकी कोणीही लक्ष दिले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 37:2
15 Iomraidhean Croise  

तेव्हा दावीद म्हणाला, “हानूनाचा बाप नाहाश ह्याने आपल्यावर दया केली तशीच मी त्याच्या पुत्रावर दया करीन.” म्हणून दाविदाने त्याच्या पित्याच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन करायला आपल्या सेवकांच्या हाती त्याला सांत्वनाचा निरोप पाठवला. मग दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले.


त्याने नाथान संदेष्टा ह्याच्या द्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वरासाठी त्याचे नाव यदीद्या (परमेश्वराला प्रिय) असे ठेवले.


परमेश्वराने आपला सेवक अहीया संदेष्टा ह्याच्या द्वारे जे वचन कळवले होते त्यानुसार सर्व इस्राएलाने त्याला मूठमाती दिली व त्याच्यासाठी शोक केला.


परमेश्वराचे वचन हनानीचा पुत्र येहू संदेष्टा ह्याच्या द्वारे बाशा व त्याचे घराणे ह्यांच्याविरुद्ध प्राप्त झाले; ह्याचे कारण हे की बाशाने यराबामाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून परमेश्वराला संताप आणला व त्याने नादाबास ठार मारले.


सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले.


तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.”


जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो तो आपले स्वत:चे पाय कापून घेतो, त्याचे नुकसान त्याच्या पदरी पडते.


अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात.


“परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, जा, आणि यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देईन व तो ते अग्नीने जाळून टाकील;


हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;


मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे; मीच दिव्यदर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टान्त देऊन बोध केला आहे.


मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी केल्या.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan