Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 37:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग सिद्कीया राजाने कोणाला तरी बोलाविणे पाठवून त्यास राजावाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, “परमेश्वराकडून काही वचन आहे का?” यिर्मया म्हणाला, “आहे, व पुढे म्हणाला, तुला बाबेलाच्या राजाच्या हाती दिले जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 37:17
25 Iomraidhean Croise  

तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हे मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर युद्ध करायला जावे की न जावे?” त्याने त्याला म्हटले, “जा, यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”


राजा त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या नावाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे?”


त्यांनी सिद्कीयाच्या पुत्रांचा त्याच्या डोळ्यांदेखत वध केला आणि सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बेड्यांनी जखडून बाबेलास नेले.


परमेश्वर म्हणतो, तुझ्या बर्‍यासाठी मी तुला खचीत बळ देईन; अनिष्टाच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचीत करीन.


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


परमेश्वर खरोखर म्हणतो, खाण्याजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्यांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार, आणि ह्या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुशलेमेचे अवशिष्ट लोक ह्यांचे मी करीन.


मेंढपाळांना पळायला मार्ग राहणार नाही, कळपांचे प्रमुख निभावणार नाहीत.


तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”


तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही.”


तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग केला; त्यांनी सिद्कियाला यरीहोच्या मैदानात गाठले, व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.


नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.


तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीजवळ उभा होता. आणि बालाकाने त्याला विचारले, “परमेश्वर काय बोलला?”


कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.


Lean sinn:

Sanasan


Sanasan