Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 37:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 सरदारांनी यिर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेवले, त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ते अधिकारी यिर्मयावर रागावले. त्यांनी त्यास मारले आणि त्यास बंदिशाळेत ठेवले, जे योनाथान लेखक याचे घरच होते, कारण ते त्यांनी बंदिशाळेत बदलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते यिर्मयाहवर संतापले आणि त्यांनी त्याला फटके मारवले आणि योनाथान चिटणीसाच्या घरात, जे त्यांनी कारागृह केले होते, त्यात त्याला कैद केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 37:15
27 Iomraidhean Croise  

योसेफाच्या धन्याने त्याला धरले, आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदिशाळेत त्याला टाकले; तो त्या बंदिशाळेत राहिला.


हे ऐकून आसा त्या द्रष्ट्यावर रागावला, व त्याने त्याला अटकेत ठेवले; कारण त्यामुळे तो त्याच्यावर फार कोपायमान झाला होता. ह्याच सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालवला.


आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ‘ह्या माणसाला बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”’


हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच; त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस, आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस; म्हणजे ते तुझ्यापुढे ठोकर खाऊन पडतील; तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव.


तेव्हा सरदार व सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही; कारण परमेश्वर आमचा देव ह्याच्या नामाने तो आमच्याबरोबर बोलला आहे.”


त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्‍यांच्या चौकात बंदीमध्ये होता.


आता, अहो माझे स्वामीराज, माझे ऐका; माझी विनंती आपणांला मान्य होवो; मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर मी तेथे मरेन.”


त्या वेळी यिर्मयाचे लोकांत जाणेयेणे होते, कारण त्याला अद्यापि बंदिशाळेत टाकले नव्हते.


तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’


मग राजपुत्र मल्कीया ह्याची पहारेकर्‍यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले; त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला.


यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात कैदी होता तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले ते असे :


तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला.


म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल;


त्यांनी त्याचे डोळे बांधून व त्याच्या थोबाडीत मारून त्याला विचारले, “अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारले?”


त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा असलेला एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय?”


आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले.


“ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”


तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि ‘येशूच्या नावाने बोलू नका’ अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.


तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan