Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 36:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा असे झाले की यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या मासी यरुशलेमेतले सर्व लोक व यहूदाच्या नगरांतून जे सर्व यरुशलेमेस आले होते त्यांनी परमेश्वरापुढे जाहीर उपवास नेमला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 योशीयाचा पुत्र यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या महिन्यात यरूशलेमेतल्या सर्व लोकांनी व जे सर्व लोक यहूदाच्या नगरांतून यरूशलेमेस आले त्यांनीही परमेश्वराच्या आदरासाठी उपासाची घोषणा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 योशीयाहचा पुत्र राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी नवव्या महिन्यात यरुशलेममधील लोकास व जे यहूदीया प्रांतातील नगरातून आले होते, त्या लोकास याहवेहपुढे उपवास करण्याची घोषणा करण्यात आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 36:9
16 Iomraidhean Croise  

यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले.


ह्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इस्राएल लोक उपास करून गोणपाट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकत्र झाले.


“जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”


यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे :


हा नववा महिना असून राजा हेमंतगृहात बसलेला होता व त्याच्यापुढे शेगडी पेटलेली होती.


म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव; तसेच यहूदाच्या नगरांतून येणार्‍या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखव.


याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.


उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणार्‍या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा.


“त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्‍चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.


तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणताट नेसले.


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांती ह्यांची आवड धरा.


मग सर्व इस्राएल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले; त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली.


तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, “आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे.” तेव्हा शमुवेल मिस्पात इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan