Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 36:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील; कारण परमेश्वराने ह्या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कदाचित् ते परमेश्वरापुढे आपली दयेची विनंती सादर करतील. कदाचित प्रत्येक व्यक्ती आपल्या कुमार्गापासून वळेल, कारण परमेश्वराचा जो क्रोध व कोप या लोकांविरूद्ध सांगितला आहे तो भयंकर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कदाचित ते याहवेहकडे क्षमेची याचना करतील व आपल्या दुष्ट मार्गापासून वळतील, कारण या लोकांविरुद्ध याहवेहने उच्चारलेले संताप व प्रकोप अत्यंत घोर आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 36:7
36 Iomraidhean Croise  

“हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्यातर्फे व सर्व यहूदाच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा; आमच्या वाडवडिलांनी ह्या ग्रंथातली वचने ऐकली नाहीत व आमच्यासाठी जे ह्यात लिहिले आहे ते पाळले नाही म्हणून परमेश्वराचा आमच्यावर मोठा क्रोध भडकला आहे.”


कारण ह्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे, म्हणून ह्या स्थानावर माझा क्रोध भडकेल, तो शांत व्हायचा नाही.


“हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्राएल व यहूदा ह्यांत जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा. ह्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आमच्यावर केली आहे, ती फार मोठी आहे.”


तसेच यहूदाचा राजा योशीयापुत्र यहोयाकीम ह्याच्या काळापासून यहूदाचा राजा योशीयापुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेमकरांना बंदिवान करून नेले तेथवर ते वचन आले.


तू ह्या लोकांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारतील, ‘परमेश्वराने हे सर्व मोठे अरिष्ट आमच्यावर येईल असे का सांगितले? परमेश्वर आमचा देव ह्याच्याविरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पातक केले आहे?’


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”


राग, संताप व क्रोध ह्यांनी भरून, बाहू उभारून, बलवान महाभुजाने तुमच्याशी मी स्वत: लढेन.


ते म्हणाले, ‘तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल;


न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यांतला प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्याच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अनिष्ट आणण्याचे मी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल.


न जाणो यहूदाच्या घराण्यावर जे सर्व अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे ते ऐकून ते सर्व आपापल्या कुमार्गापासून वळतील आणि मी त्यांच्या दुष्कर्माची व त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करीन.”


आता, अहो माझे स्वामीराज, माझे ऐका; माझी विनंती आपणांला मान्य होवो; मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर मी तेथे मरेन.”


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,


परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.


ह्याकरता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यास लागणारी सामग्री सिद्ध कर, व भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा; त्यांच्यादेखत आपले ठिकाण सोडून दुसर्‍या ठिकाणी जा; न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल; ते तर बंडखोर घराण्यातले आहेत.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुमच्यावर राज्य करीन.


रुपे, पितळ, लोखंड, शिसे व कथील लोक भट्टीत घालतात व ती वितळण्यासाठी अग्नी फुंकून प्रदीप्त करतात त्याप्रमाणे मी आपल्या क्रोधाने व संतापाने तुम्हांला जमा करीन व भट्टीत घालून वितळवीन.


अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. मी त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील, की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे.


ह्यामुळे मी संतापून करायचे ते करीन, मी त्यांच्यावर कृपादृष्टी करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठ्याने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”


मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली आहे; तरी आपल्या अधर्मापासून परावृत्त व्हावे व तुझ्या सत्याचा उमज पडावा म्हणून आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याची काकळूत केली नाही;


हे माझ्या देवा, कान दे, ऐक; आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पाहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पाहा; आम्ही आपल्या विनवण्या आमच्या नीतिमत्तेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणांस्तव तुझ्यापुढे मांडतो.


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हातच्या जुलूमापासून मागे फिरावे.


तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका; त्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी पुकारून सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गांपासून व आपल्या दुष्कर्मांपासून परावृत्त व्हा; पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील.


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan