Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 36:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 मग यिर्मयाने दुसरा पट घेऊन नेरीयाचा पुत्र बारूख लेखक ह्याला दिला; तेव्हा यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने जो ग्रंथ अग्नीत जाळून टाकला होता त्यातली सर्व वचने त्याने त्यावर यिर्मयाच्या सांगण्यावरून लिहिली, व त्यांत तशाच दुसर्‍या बहुत वचनांची भर घातली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 मग यिर्मयाने दुसरी गुंडाळी घेतली व ती नेरीयाचा मुलगा बारूख लेखकाला दिली. आणि जी गुंडाळी यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याने अग्नीत जाळली होती तिच्यातील सर्व वचने त्याने यिर्मयाच्या तोंडून ऐकून तिच्यात लिहीली. आणखी त्यामध्ये तशाच दुसऱ्या पुष्कळ वचनांची भर घातली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 मग यिर्मयाहने पुन्हा दुसरे चर्मपत्र घेतले, यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळलेल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूखाला पुन्हा सांगून त्याच्याकडून लिहून घेतली. आणि त्यासारख्या आणखी पुष्कळ वचनाची त्यामध्ये भर घातली गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 36:32
13 Iomraidhean Croise  

परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून तयार कर म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन.


बारुखाने त्यांना म्हटले, “त्याने स्वमुखाने ही सर्व वचने मला सांगितली व मी ती शाईने ह्या पुस्तकात लिहिली.”


तेव्हा असे झाले की यहूदीने तीनचार पाने वाचून दाखवताच राजाने तो पट चाकूने कापून शेगडीतल्या पेटत्या आगीत टाकला; येणेप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला.


तेव्हा यिर्मयाने नेरीयाचा पुत्र बारूख ह्याला बोलावले, व परमेश्वराने यिर्मयाला जी वचने सांगितली होती ती सर्व त्याच्या तोंडून ऐकून बारुखाने त्या पटावर लिहिली.


हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’


बाबेलचा राजा बेलशस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टान्त घोळू लागले; मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन.


तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये सलाम सांगतो.


ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्‍या प्रत्येकाला मी निश्‍चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan