Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 36:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेव्हा राजाने राजपुत्र यमेल, अरहज्रीएलपुत्र सराया, व अब्देलपुत्र शलेम्या ह्यांना अशी आज्ञा केली की बारूख लेखक व यिर्मया संदेष्टा ह्यांना धरून आणावे; पण परमेश्वराने त्यांना लपवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 याउलट, राजाने राजपुत्र यरहमेल, अज्रीएलचा पुत्र सेरायाह व अब्देलचा पुत्र शेलेम्याह यांना हुकूम केला की त्यांनी नेरीयाहचा पुत्र लेखनिक बारूख व यिर्मयाह संदेष्टा यांना अटक करावी. परंतु याहवेहने त्यांना लपवून ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 36:26
34 Iomraidhean Croise  

“येथून निघून पूर्व दिशेस जा, व यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक लपून राहा.


“चल, सीदोनातील सारफथ नगरात जाऊन राहा; पाहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे.”


ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले.


तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले, मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


मग इस्राएलाचा राजा म्हणाला, “नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश ह्यांच्याकडे मीखायाला माघारी घेऊन जा;


तरी योराम राजाची कन्या व अहज्याची बहीण यहोशेबा हिने अहज्याचा पुत्र योवाश ह्याला त्या वधायच्या राजपुत्रांतून चोरून नेले आणि त्याला व त्याच्या दाईला बिछाने ठेवण्याच्या कोठडीत लपवून ठेवले; त्याला अथल्येच्या दृष्टिआड केल्यामुळे त्याचा वध झाला नाही.


आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ‘ह्या माणसाला बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”’


“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”


परमेश्वर तुझे येणेजाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.


कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.


तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. (सेला)


हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर; माझा जीव तुझा आश्रय करतो; ही अरिष्टे टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीचा आश्रय करीन.


दुष्टांच्या कटापासून, दुष्कर्म्यांच्या गुप्त मसलतीपासून मला लपव.


जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


चला, माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.


ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


शाफानाचा पुत्र अहीकाम ह्याचे यिर्मयाला पाठबळ होते म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही व त्यांनी त्याला ठार मारले नाही.


मग ते सरदार बारुखाला म्हणाले, “जा, यिर्मया व तू लपून राहा; तुम्ही कोठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका.”


तेव्हा यिर्मयाने बारुखाला आज्ञा केली की, “मला प्रतिबंध आहे, मला परमेश्वराच्या मंदिरात जाता येत नाही;


मग राजपुत्र मल्कीया ह्याची पहारेकर्‍यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले; त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला.


मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, “तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.”


लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले; आणि मुख्य याजक व परूशी ह्यांनी त्याला धरण्यास कामदार पाठवले.


तो मंदिरात शिकवत असता ही वचने जामदारखान्यात बोलला; तरी त्याला कोणी धरले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.


ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले; परंतु येशू मंदिरातून1 गुप्तपणे निघून गेला.


मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan