Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 36:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे; आणि योशीयाच्या दिवसांत मी तुझ्याबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्राएल, यहूदा व सर्व राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध जी वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “तू एक गुंडाळी घेऊन त्याच्यावर इस्राएल, यहूदीया व इतर राष्ट्रे यांच्याविषयी योशीयाहच्या काळापासून आतापर्यंत मी जे सर्व संदेश देत आलो आहे, ते लिही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 36:2
34 Iomraidhean Croise  

तेव्हा मेदी प्रांतातल्या अखमथा नगरातील राजवाड्यात एक गुंडाळी सापडली; तिच्यात येणेप्रमाणे लेख लिहिला होता :


माझे कोणी ऐकणारा असता तर किती बरे होते! (हेच माझे दस्तखत; सर्वसमर्थाने मला जाब द्यावा;) माझ्या प्रतिवाद्याचा लेखी आरोप दाखल झाला असता तर बरे झाले असते.


ह्यावरून मी म्हणालो, “पाहा, मी आलो आहे; ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की,


आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की, “ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल; कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून5 अजिबात पुसून टाकीन.”


परमेश्वराने मला म्हटले, “एक मोठी पाटी घेऊन तिच्यावर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर-शालाल-हाश-बज (लूट त्वरा करते, पारध घाई करते) ह्याविषयी.”


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


“मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”


तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत;


हे याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व गोत्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका.


“यहूदाचा राजा आमोनाचा पुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून आजवर तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हांला सांगत आलो, मोठ्या निकडीने सांगत आलो; तरी तुम्ही ते ऐकले नाही.


“परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो की जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव.


तेव्हा त्या सर्व सरदारांनी यहूदी बिन नथन्या बिन शलेम्या बिन कूशी ह्याच्या हाती बारुखाला असे सांगून पाठवले की, “ज्या पटातून तू लोकांना वाचून दाखवले तो हाती घेऊन ये.” तेव्हा नेरीयाचा पुत्र बारूख आपल्या हाती पट घेऊन त्यांच्याकडे आला.


बारुखाने त्यांना म्हटले, “त्याने स्वमुखाने ही सर्व वचने मला सांगितली व मी ती शाईने ह्या पुस्तकात लिहिली.”


तेव्हा असे झाले की यहूदीने तीनचार पाने वाचून दाखवताच राजाने तो पट चाकूने कापून शेगडीतल्या पेटत्या आगीत टाकला; येणेप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला.


आणि यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला तू असे सांग, ‘परमेश्वर म्हणतो, तू हा पट जाळून म्हटले, तू ह्यावर का लिहिले की बाबेलचा राजा येईलच व ह्या देशाचा विध्वंस करील आणि ह्यातून मनुष्य व पशू ह्यांचे निर्मूलन करील?”


म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव; तसेच यहूदाच्या नगरांतून येणार्‍या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखव.


यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बारूख बिन नेरीया ह्याने यिर्मयाच्या तोंडची ही वचने पुस्तकात लिहिली तेव्हा त्याला यिर्मया संदेष्टा हे वचन बोलला :


बाबेलवर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलविरुद्ध जी वचने लिहिण्यात आली होती ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती.


मी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता;


मी त्याच्यासाठी आपल्या नियमशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात.


मोशेने ह्या नियमशास्त्राची वचने अथपासून इतिपर्यंत लिहून ग्रंथ पुरा केला.


ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan