Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 36:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराच्या नवीन द्वाराच्या देवडीजवळ वरच्या चौकातील शाफानाचा पुत्र गमर्‍या लेखक ह्याच्या दिवाणखान्यात बारुखाने परमेश्वराच्या मंदिरात, ग्रंथात लिहिलेली यिर्मयाची वचने सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा बारूखाने मोठ्याने यिर्मयाची गुंडाळीवरील वचने परमेश्वराच्या घरात शाफान लेखकाचा मुलगा गमऱ्या याच्या खोलीत, वरील अंगणात, नव्या दाराच्या प्रवेशाजवळ सर्व लोकांच्या कानी पडतील अशी वाचली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शाफानचा पुत्र गमर्‍याह चिटणीस, याच्या याहवेहच्या मंदिरात वरच्या सभागृहाच्या बाजूस नव्या द्वारातील प्रवेशमार्गाजवळील कचेरीमध्ये नेरीयाहचा पुत्र बारूख यिर्मयाहची वचने लिहिलेले हे चर्मपत्र वाचण्यासाठी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 36:10
17 Iomraidhean Croise  

शबा चिटणीस होता; सादोक व अब्याथार हे याजक होते;


अहीटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अहीमलेख हे याजक होते, आणि सराया हा चिटणीस होता;


त्याने आतले अंगण बांधले होते त्याला चिर्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग लावली होती.


तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करत व धूप जाळत होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा त्याने बांधला.


मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्याला त्यांनी रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.


आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीया राजाने आपला चिटणीस शाफान बिन असल्या बिन मशुल्लाम ह्याला परमेश्वराच्या मंदिरात पाठवले.


हे ऐकल्यावर यहूदाचे सरदार राजगृहातून परमेश्वराच्या मंदिरात आले व परमेश्वराच्या मंदिराच्या नवीन द्वाराच्या देवडीत बसले.


शाफानाचा पुत्र अहीकाम ह्याचे यिर्मयाला पाठबळ होते म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही व त्यांनी त्याला ठार मारले नाही.


ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कीयाचा पुत्र गमर्‍या ह्यांच्या हस्ते रवाना केले; त्यांना यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे बाबेलास पाठवले; त्या पत्रातील मजकूर असा होता :


आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.


मीखाया बिन गमर्‍या बिन शाफान ह्याने त्या ग्रंथातील परमेश्वराची सर्व वचने ऐकली,


राजाने तो पट जाळू नये म्हणून एलनाथान, दलाया व गमर्‍या ह्यांनी त्याला विनंती केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही.


म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव; तसेच यहूदाच्या नगरांतून येणार्‍या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखव.


यिर्मया संदेष्ट्याच्या सांगण्याप्रमाणे नेरीयाचा पुत्र बारूख ह्याने सर्वकाही केले; त्याने परमेश्वराची वचने परमेश्वराच्या मंदिरात ग्रंथातून वाचून दाखवली.


तर तू आम्हांला खास्द्यांच्या हाती द्यावे आणि त्यांनी आम्हांला जिवे मारावे, आम्हांला बंदिवान करून बाबेलास न्यावे म्हणून बारूख बिन नेरीया तुला आमच्याविरुद्ध मथवत आहे.”


योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजास त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे सात पुरुष त्याला शहरात आढळले त्यांना त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतींचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ असामी त्यांनाही त्याने नेले.


द्वारांजवळ खांबांना लागून एकेक खोली असून तिला दार होते; तेथे होमबली धूत असत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan