यिर्मया 35:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पण ते म्हणाले, “आम्ही द्राक्षारस पिणार नाही, कारण आमचा पूर्वज रेखाब ह्याचा पुत्र योनादाब ह्याने आम्हांला ताकीद केली आहे की, ‘तुम्ही व तुमच्या वंशजांनी द्राक्षारस कदापि पिऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण ते म्हणाले, “आम्ही द्राक्षरस पिणार नाही, कारण आमचे पूर्वज, रेखाब यांचा मुलगा योनादाब, यांने आम्हास आज्ञा दिली, ‘तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी सर्वकाळपर्यंत कोणताही द्राक्षरस पिऊ नये.’ Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु त्यांनी द्राक्षारस घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “आम्ही पीत नाही, कारण आमचा पूर्वज, रेखाबचा पुत्र योनादाब याने आम्हाला अशी आज्ञा केली की, आम्ही किंवा आमच्या वंशजापैकी कोणीही कधीही द्राक्षारस पिऊ नये. Faic an caibideil |
तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीला येताना त्याला आढळला; त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्याला म्हटले, “तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय?” यहोनादाब म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “असे असेल तर मला तुझा हात दे.” त्याने त्याला हात दिला आणि आपल्या रथात घेतले.