Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 35:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “रेखाब्यांच्या घराण्याकडे जा, त्यांच्याबरोबर भाषण कर, आणि परमेश्वराच्या मंदिरात, त्यातल्या एका कोठडीत आणून त्यांना द्राक्षारस प्यायला दे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “रेखाब्याच्या घराण्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. मग त्यांना माझ्या घरातील एका खोलीत आण आणि त्यांना पिण्यास मद्य दे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “रेखाबी लोकांच्या घराण्याकडे जा आणि त्यांना याहवेहच्या मंदिरातील एखाद्या आतील खोलीत ने आणि द्राक्षारस प्यावयास दे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 35:2
21 Iomraidhean Croise  

सर्व मंदिराला लागून जे मजले होते ते पाच-पाच हात उंच होते व ते गंधसरूच्या तुळयांनी मंदिराला भिडवले होते.


बाहेरच्या कोठड्यांतील मजल्यांचे दार मंदिराच्या उजव्या बाजूस होते; लोक नागमोडी शिडी चढून मधल्या कोठड्यांत जात; आणि मधल्यांतून वरच्या कोठड्यांत जात.


आणि याबेस येथे राहणारी लेखकांची कुळे म्हणजे तिराथी, शिमाथी व सुकाथी; ही रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथ ह्याच्या वंशातली केनी कुळे होत.


अहरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिराची अंगणे व कोठड्या ह्यांत सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधीचे सर्व काम त्यांच्याकडे होते.


त्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराची अंगणे, चोहोबाजूंच्या कोठड्या, देवमंदिराची भांडारे व समर्पित केलेल्या वस्तूंची भांडारे ह्यांचे जे नमुने दैवी आत्म्याच्या प्रेरणेने त्याला मिळाले होते ते सर्व त्याने त्याला दिले.


चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते.


वर सांगितलेले गायक लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख होते; ते कोठड्यांत राहत; त्यांना इतर काही काम नसे; ते रात्रंदिवस आपल्या कामात गुंतलेले असत.


सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल होते. त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढवल्या.


मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात खोल्या बांधण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे त्या बांधल्या.


सावध राहा; यरुशलेमेत मुख्य याजक, लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळातले सरदार ह्यांच्यासमोर परमेश्वराच्या मंदिराच्या कोठड्यांत ही सर्व तोलून होईपर्यंत ह्यांचे रक्षण करा.”


त्याने तोबियासाठी एक मोठी कोठडी तयार केली होती; त्या कोठडीत पूर्वी अन्नबलीची सामग्री, ऊद, पात्रे आणि लेवी, गायक व द्वारपाळ ह्यांना शास्त्राज्ञेप्रमाणे द्यायचे धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे दशमांश, व याजकांना द्यायची समर्पित अंशांची अर्पणे ही ठेवत असत.


तेव्हा मी याजना बिन यिर्मया बिन हबसिन्या ह्याला, त्याच्या बांधवांना व त्याच्या पुत्रांना आणि रेखाब्यांच्या घराण्यातील इतर सर्वांना बरोबर घेतले.


आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.


आमचा पूर्वज रेखाब ह्याचा पुत्र योनादाब ह्याने आम्हांला जो निर्बंध घालून दिला तो सर्व आजवर आम्ही पाळत आलो आहोत; आमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांसह आम्ही कधी द्राक्षारस प्यालो नाही;


त्या चौक्यांना व द्वारांच्या आतल्या बाजूंना त्यांच्या खांबांना झरोके होते; भिंतीच्या महिरपींनाही झरोके होते; असे आतल्या चोहोबाजूंना झरोके होते, व खांबांवर खजुरीची झाडे कोरलेली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan