Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या वेळेस बाबेलचे सैन्य यरुशलेमेवर आणि यहूदाची उरलेली नगरे म्हणजे लाखीश व अजेका ह्यांवर चढाई करून युद्ध करीत होते; यहूदाची तटबंदी केलेली नगरे एवढीच उरली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यावेळी बाबेलाच्या राजाचे सैन्य यरूशलेमेविरूद्ध लढत आणि यहूदातील उरलेल्या सर्व नगराविरूद्ध म्हणजे लाखीश व अजेकाशी लढत होते. यहूदामध्ये तटबंदी असलेली ही नगरे राहिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुशलेमशी युद्ध करीत होते, यहूदीया प्रांतातील इतर नगरे—लाखीश व अजेकाह—अद्यापही टिकाव धरून होती. यहूदीयात एवढीच तटबंदी असलेली शहरे बाकी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:7
18 Iomraidhean Croise  

यरुशलेमेत त्याच्याविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला; पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले;


नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराशी लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून त्याने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती.


त्याने यहूदाच्या पहाडी देशात शहरे वसवली आणि वनात गढ्या व बुरूज बांधले.


तेव्हा अश्शूरच्या राजाने लाखीशाहून रब-शाके1 ह्याला मोठ्या सैन्यानिशी हिज्कीया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो परटाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला.


यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळी मारतील; पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सर्व सैन्य, त्याच्या सत्तेखाली असलेली जगातली सर्व राज्ये व सर्व लोक ह्यांनी यरुशलेमेबरोबर व तिच्या सर्व नगरांबरोबर युद्ध चालवले, तेव्हा यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :


यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’


आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.


लाखीशाच्या रहिवासिणी, रथास वेगवान घोडे जोड; सीयोनकन्येच्या पापाचा आरंभ तिच्यापासून झाला; कारण इस्राएलाचे अपराध तुझ्या ठायी आढळले.


तुझ्या देशातील सर्व उंच व मजबूत तट, ज्यांवर तू भिस्त ठेवशील ते पाडून टाकीपर्यंत तुला तुझ्या सर्व नगरांच्या आत ते कोंडतील, आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशातील सर्व नगरांच्या आत तुला ते वेढतील.


मग यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर ह्यांना निरोप पाठवला की,


तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढू लागले.


यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा,


यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका;


लाखीश, बसकाथ व एग्लोन;


Lean sinn:

Sanasan


Sanasan