Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, तर तुला पकडून त्याच्या हाती निश्‍चये देतील; तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला पाहशील व तो तुझ्याबरोबर समक्ष बोलेल; तू बाबेलास जाशील.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, कारण खात्रीने पकडला जाऊन आणि त्याच्या हाती दिला जाशील. जेव्हा तू बाबेलास जाशील, तू आपल्या डोळ्यांनी बाबेलाच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील आणि तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तू त्याच्या तावडीतून सुटणार नाहीस पण तू पकडल्या जाशील व त्याच्या हातात पडशील. तू स्वतःच्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला बघशील, आणि तो तुझ्याशी समोरासमोर बोलेल व तू बाबेलला जाशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:3
18 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


ती बाबेलास नेण्यात येतील व मी त्यांचा समाचार घेईपर्यंत ती तेथेच राहतील; मग मी ती तेथून घेऊन ह्या स्थली परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो.”


ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी हे नगर खास्द्यांच्या हाती देईन, ते बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन व तो ते हस्तगत करील.


यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने त्याला अटकेत टाकले तेव्हा तो त्याला म्हणाला होता की, “तू असा संदेश का देतोस की परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देतो, व तो ते हस्तगत करील;


आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातून सुटणार नाही, तर बाबेलच्या राजाच्या हाती खातरीने दिला जाईल; तो त्याच्याशी समक्ष बोलेल, आपल्या डोळ्यांनी त्याला पाहील;


आणि यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना मी त्यांच्या वैर्‍यांच्या हाती देईन, त्यांच्या जिवांवर टपणार्‍यांच्या हाती देईन व बाबेलच्या राजाचे जे सैन्य तुमच्यापुढून निघून गेले आहे त्याच्या हाती देईन.


तथापि हे सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक; परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की, ‘तू तलवारीने मरणार नाहीस,


मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.”


पण तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे न गेलास तर हे नगर खास्दी लोकांच्या हाती देण्यात येईल, ते नगर ते अग्नीने जाळतील व तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस.”


तुझी सर्व बायकापोरे खास्द्यांकडे नेतील; तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस, बाबेलच्या राजाच्या हाती पडशील; तू हे नगर अग्नीने जाळण्यास कारण होशील.”


मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.


पण त्याने त्यांच्याविरुद्ध फितुरी करून मिसर देशाने आपणास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून त्याच्याकडे आपले जासूद पाठवले. त्याला यश मिळेल काय? ज्याने अशी गोष्ट केली तो निभावेल काय? त्याने करार मोडला आहे तरी तो निभावेल काय?


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ज्याने त्याला राजा केले, ज्याच्याशी केलेली आणभाक त्याने तुच्छ मानली, ज्याचा करार त्याने मोडला, त्या राजाच्या निवासस्थानी, बाबेलात तो मरेल.


हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan