Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आणि यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना मी त्यांच्या वैर्‍यांच्या हाती देईन, त्यांच्या जिवांवर टपणार्‍यांच्या हाती देईन व बाबेलच्या राजाचे जे सैन्य तुमच्यापुढून निघून गेले आहे त्याच्या हाती देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्यास हाती व बाबेलाच्या राजाचे जे सैन्य तुम्हापासून निघून गेले आहे त्यांच्या हाती देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:21
16 Iomraidhean Croise  

ते राजाला पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले; त्यांनी त्याची शिक्षा ठरवली.


तुझा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाती, तुला ज्यांची भीती आहे त्यांच्या हाती, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, खास्द्यांच्या हाती मी तुला देईन.


यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने त्याला अटकेत टाकले तेव्हा तो त्याला म्हणाला होता की, “तू असा संदेश का देतोस की परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देतो, व तो ते हस्तगत करील;


आणि यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या हातून सुटणार नाही, तर बाबेलच्या राजाच्या हाती खातरीने दिला जाईल; तो त्याच्याशी समक्ष बोलेल, आपल्या डोळ्यांनी त्याला पाहील;


रिब्ला येथे बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधले; त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहूदाचे सर्व मानकरी वधले;


परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा वैरी जो बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर तो त्याचा घात करण्यास पाहत होता, त्याच्या हाती मी त्याला दिले त्याप्रमाणे मिसरी राजा, फारो हफ्रा ह्याला मी त्याच्या वैर्‍यांच्या व त्याचा घात करू पाहणार्‍यांच्या हाती देईन.”


बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे पुत्र त्याच्या डोळ्यां-देखत वधले; तसेच त्याने यहूदाचे सर्व सरदार रिब्ला येथे मारून टाकले.


तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग केला; त्यांनी सिद्कियाला यरीहोच्या मैदानात गाठले, व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.


परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.


“ह्या बंडखोर घराण्याला सांग, ह्या गोष्टी काय आहेत हे तुम्हांला समजत नाही काय? त्यांना सांग की, पाहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार ह्यांना धरले व आपणाकडे बाबेल येथे आणवले.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ज्याने त्याला राजा केले, ज्याच्याशी केलेली आणभाक त्याने तुच्छ मानली, ज्याचा करार त्याने मोडला, त्या राजाच्या निवासस्थानी, बाबेलात तो मरेल.


मी आपले जाळे त्याच्यावर टाकीन; तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास नेईन; त्याने माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघातासंबंधाने तेथे मी त्याची झडती घेईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan