Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्यांना त्यांच्या वैर्‍यांच्या हाती देईन, म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील त्यांच्या जिवांवर टपणार्‍यांच्या हाती देईन. म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातात देईल आणि त्यांना त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्याच्या हाती देईल. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व पृथ्वीवरील पशूंना भक्ष्य होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मी जे तुम्हाला ठार करू पाहतात त्या तुमच्या शत्रूंच्या हवाली करेन. त्यांची प्रेते पक्षी व हिंस्र श्वापदांचे अन्न होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:20
25 Iomraidhean Croise  

यराबामाच्या घराण्यातला जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातली पाखरे खाऊन टाकतील, कारण परमेश्वर हे बोलला आहे.


बाशाचा जो कोणी नगराच्या आत मरेल त्याला कुत्री खाऊन टाकतील; त्यांच्यातला जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातील पक्षी खाऊन टाकतील.”


त्यांनी आकाशातल्या पाखरांना तुझ्या सेवकांची प्रेते, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्या भक्तांचे मांस खाण्यास दिले आहे.


अनाथोथचे जे लोक माझ्या जिवावर टपले असून म्हणतात की, “तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नकोस, देशील तर आमच्या हातून मरशील,” त्यांच्याविरुद्ध परमेश्वर बोलला आहे.


माझे वतन मला चित्रविचित्र रंगांच्या गिधाडाप्रमाणे आहे काय? तिला गिधाडांनी घेरले काय? चला, वनांतले सर्व पशू जमवा, तिला खाऊन टाकण्यास त्यांना आणा.


तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.


ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


तुझा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाती, तुला ज्यांची भीती आहे त्यांच्या हाती, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, खास्द्यांच्या हाती मी तुला देईन.


सिद्कीयाने गुप्तपणे यिर्मयाला प्रतिज्ञापूर्वक म्हटले, “आमचा जीव ज्याने उत्पन्न केला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी तुला जिवे मारणार नाही व तुझा प्राण घेऊ पाहणार्‍या ह्या लोकांच्या हाती तुला देणार नाही.”


रिब्ला येथे बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधले; त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहूदाचे सर्व मानकरी वधले;


हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.


परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा वैरी जो बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर तो त्याचा घात करण्यास पाहत होता, त्याच्या हाती मी त्याला दिले त्याप्रमाणे मिसरी राजा, फारो हफ्रा ह्याला मी त्याच्या वैर्‍यांच्या व त्याचा घात करू पाहणार्‍यांच्या हाती देईन.”


एलामाचा घात करू पाहणार्‍या त्याच्या शत्रूंपुढे मी त्यांना घाबरे करीन; मी त्यांच्यावर अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन, असे परमेश्वर म्हणतो; मी त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.


ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.


प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, ज्यांचा तू द्वेष करतेस त्यांच्या स्वाधीन तुला मी करीन, ज्यांच्यावरून तुझे मन उडाले आहे त्यांच्या हाती तुला देईन;


मी तुला व तुझ्या नद्यांतल्या सर्व माशांना सोडून देईन; तू उघड्या मैदानात पडून राहशील; तुला कोणी उचलून आणणार नाही किंवा तुझी कोणी जुळवाजुळव करणार नाही, तर तू वनपशूंना व आकाशातील पाखरांना खाद्य होशील असे मी करीन.


मी तुला जमिनीवर सोडून देईन, उघड्या मैदानात तुला फेकून देईन, आकाशातील सर्व पाखरे तुझ्यावर बसतील असे मी करीन, सर्व पृथ्वीवरील वनपशूंची तुझ्या मांसाने तृप्ती करीन.


तुझे शव आकाशातल्या पक्ष्यांना व पृथ्वीवरल्या पशूंना खाद्य होईल व त्यांना हुसकायला कोणी असणार नाही.


तो दाविदाला म्हणाला, “असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देतो.”


आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan