यिर्मया 34:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघला व माझ्यासमोर केलेल्या कराराच्या शर्ती पाळल्या नाहीत त्यांचे, जे वासरू त्यांनी कापून दुभागले व त्याच्या दोहो भागांमधून ते चालून गेले, त्या वासराप्रमाणे करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग ज्या लोकांनी माझा कराराचा भंग केला आहे, ज्यांनी माझ्यासमोर केलेल्या कराराचे वचन पाळले नाही. त्यांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ज्यांनी माझा करार मोडला व माझ्या करारातील अटी पूर्ण करण्याचे नाकारले आहे, त्यांना ज्याप्रमाणे वासरू कापून त्याचे दोन भाग करून त्यामधून चालत जावे, त्याचप्रमाणे मी त्यांना वागवेन. Faic an caibideil |