Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूला व आपल्या शेजार्‍याला मोकळे करावे, हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही; म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला तलवार, मरी व दुष्काळ ह्यांच्या योगे नाश पावायला मोकळे सोडून देतो; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी तुमचे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्राएलास स्वातंत्र्य जाहीर करायचे होते. तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हाविरुध्द तलवारीला, मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण पृथ्वीवरील प्रत्येक राज्याच्या दृष्टीने मी तुम्हास असे काही करीन की, त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:17
26 Iomraidhean Croise  

तेव्हा जो खांब मर्दखयासाठी हामानाने तयार केला होता त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले.


ते जर तुला म्हणतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, “जे मृत्यूसाठी नेमलेले आहेत त्यांनी मृत्यूकडे, जे तलवारीसाठी नेमलेले आहेत त्यांनी तलवारीकडे, जे दुष्काळासाठी नेमलेले आहेत त्यांनी दुष्काळाकडे व जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत त्यांनी बंदिवासात जावे.”’


यहूदाचा राजा हिज्कीया ह्याचा पुत्र मनश्शे ह्याने यरुशलेमेत जे काही केले त्यामुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन.


परमेश्वर म्हणतो, मग यहूदाचा राजा सिद्कीया, त्याचे चाकर व त्याच्या प्रजेतले जे कोणी मरी, तलवार व दुष्काळ ह्यांतून वाचून ह्या नगरात राहतील त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, व जे त्यांचा जीव घेण्यास टपत आहेत त्यांच्या हाती देईन; तो त्यांना तलवारीने मारून टाकील; तो त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर दयामाया करणार नाही.’


पाहा, मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन; मी त्यांना वाईट अंजिरांसारखे करीन, ते नासल्यामुळे खाववत नाहीत.


मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील.


पाहा, हे नगर घेण्यासाठी त्याला वेढा घालणार्‍यांचे मोर्चे लागले आहेत; तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे ह्यांच्याशी युद्ध करणार्‍या खास्द्यांच्या हाती हे लागले आहे; तू बोललास तसे घडले आहे. पाहा, हे तुला दिसत आहे.


तरी, हे प्रभू परमेश्वरा, हे नगर खास्द्यांच्या हाती लागत असता तू मला म्हणालास, ‘पैसा देऊन हे शेत आपल्यासाठी विकत घे व साक्षी बोलाव.”’


तरी आता ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता की, ‘ते तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे बाबेलच्या राजाच्या हाती जायचे आहे,’ त्याविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो,


सिद्कीया राजाने त्या वेळी यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :


“परमेश्वर म्हणतो, जो ह्या नगरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने व मरीने मरेल; पण जो खास्द्यांकडे जाईल तो जगेल, तो जिवानिशी सुटेल.


यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.


तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.


कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल.


फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.


तर आपल्या बांधवाचे जे करण्याचे त्याने योजले असेल तेच तुम्ही त्याचे करावे; अशा रीतीने तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan