यिर्मया 34:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण तुम्ही पुन्हा बदलून माझ्या नामाची अप्रतिष्ठा केली व प्रत्येकाने ज्या आपल्या दासाला व दासीला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य दिले होते त्यांना तुम्ही परत येण्यास लावले, व त्यांनी तुमचे दास व दासी व्हावे म्हणून त्यांना तुम्ही आपले ताबेदार केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले; ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कोठेही जाण्यास पाठवले होते. त्यांना तुम्ही प्रत्येक मनुष्याने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले. त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली. Faic an caibideil |