यिर्मया 34:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ‘कोणी तुझ्या इब्री बांधवापैकी असून त्यास तुला विकले असले तर सात वर्षांच्या शेवटी प्रत्येकाने आपल्या बंधूला बंधमुक्त करावे; त्याने सहा वर्षे तुझे दास्य केल्यावर त्याला तू मुक्त करून रवाना करावेस.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व आपला कान दिला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्यास तुम्ही प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा, त्याने सहा वर्षे तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे; परंतु तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही. Faic an caibideil |
मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.