Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ज्यांना मी आपल्या क्रोधाने व संतापाने वधले व ज्यांच्या सगळ्या दुष्टतेमुळे मी ह्या नगरापासून आपले मुख लपवले त्यांनी खास्द्यांबरोबर युद्ध करताना ती घरे त्यांच्या प्रेतांनी भरून टाकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 खास्दी लढाईस येत असताना ज्या लोकांस मी आपल्या क्रोधाने आणि कोपाने ठार केले तेव्हा त्यांच्या सर्व दुष्टतेमुळे मी आपले मुख या नगरापासून लपविले आहे त्यांच्या मृतदेहाने जी घरे भरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 बाबेलांशी युद्ध करताना: ‘ज्या लोकांवर मी माझ्या कोपाने प्रहार करणार आहे, ते त्या लोकांच्या शवांनी भरून जातील. त्यांनी केलेल्या सर्व दुष्टतेमुळे मी या नगराला विमुख होईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:5
16 Iomraidhean Croise  

तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस.


परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,


पूर्वेकडील वार्‍याप्रमाणे मी त्यांना शत्रूपुढे विखरीन; त्यांच्या संकटसमयी मी त्यांच्याकडे पाठ करीन, तोंड करणार नाही.”


कारण मी ह्या नगराकडे तोंड केले आहे ते त्याच्या वाइटासाठी, त्याच्या बर्‍यासाठी नव्हे, असे परमेश्वर म्हणतो; ते बाबेलच्या राजाच्या हाती जाईल, तो त्याला आग लावून देईल.’


आणि तो सिद्कीयाला बाबेलास नेईल व मी त्याचा समाचार घेईन तोवर तो तेथे राहील, असे परमेश्वर म्हणतो; तुम्ही खास्द्यांशी लढला तरी तुमची सरशी होणार नाही?”


“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्‍यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.


परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे, त्याला आपल्या पवित्रस्थानाचा वीट आला आहे; त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत; पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे.


मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तेव्हा ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकणार नाही; तो त्या वेळेस त्यांना पराङ्मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत.


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


त्या वेळेस ते अन्य देवांकडे वळल्याने त्यांच्या हातून जी दुष्टाई घडेल तिच्यामुळे मी आपले मुख त्यांच्यापासून खरोखरच लपवीन.


मग तो म्हणाला, ‘मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन; कारण ही पिढी अतिशय कुटिल आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan