Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ‘मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहीत नसलेल्या महान आणि शोधता न येणाऱ्या गोष्टी तुला सांगेन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:3
29 Iomraidhean Croise  

जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्‍या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.


परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्‍यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे.


तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो.


त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.


तर तुमच्यापैकी एकाने आपल्या शेजार्‍याला व आपल्या बांधवाला म्हणावे, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले? परमेश्वर काय बोलला?’


तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन.


‘अहा प्रभू परमेश्वरा! पाहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली; तुला अवघड असे काही नाही.


“पाहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे; मला अवघड असे काही आहे काय?


आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यांना विनंती केली की, ह्या रहस्यासंबंधाने स्वर्गीय देवाने आपणांवर दया करावी असे त्याच्याजवळ मागावे.


तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो.


हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बल ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस; तू आम्हांला राजाची गोष्ट कळवली आहेस.”


तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल; कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यांत राहतील.


प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.


तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.


ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”


तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून :


जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार्‍या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे,


पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधाला लागलात तर तो तुम्हांला पावेल.


कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ‘राखलेल्या मान्न्यातून मी देईन’ आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर ‘नवे नाव’ लिहिलेले असेल, ते तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan