Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तरच याकोब व माझा सेवक दावीद ह्यांच्या संततीचा मी त्याग करीन आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या संततीवर सत्ता चालवण्यास ठेवणार नाही; मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्यांच्यावर दया करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद याच्या संततीचा मी त्याग करीन आणि दावीदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तर मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या या वंशजांवर राज्य करण्यास याकोबाचे व माझा सेवक दावीदाचे वंशज नाकारले असते व दावीदाच्या पुत्राला निवडले नसते. पण मी त्यांची पूर्वीची समृद्धी त्यांना परत देईन व त्यांच्यावर दया करेन.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:26
17 Iomraidhean Croise  

यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे :


ह्या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथीनीम हे आपापल्या नगरात राहिले; असे सर्व इस्राएल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले.


सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.


जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.


एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो; म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो.


जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की,


परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो.


“हे लोक म्हणतात की, ‘परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय?’ ह्या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आता मी याकोबाचा बंदिवास उलटवीन आणि इस्राएलाच्या अवघ्या घराण्यावर दया करीन; माझ्या पवित्र नामाची ईर्ष्या धरीन.


यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”


मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”


मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन.


त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan