Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 “हे लोक म्हणतात की, ‘परमेश्वराने निवडलेल्या दोन्ही घराण्यांचा त्याग केला नाही काय?’ ह्या त्यांच्या म्हणण्याकडे तू लक्ष दिले ना? ते माझ्या लोकांचा असा धिक्कार करतात की ते त्यांना राष्ट्र समजत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 “हे लोक जे काय बोलले, ते तू ऐकलेस लक्षात घेतले नाहीस, ते म्हणतात की, जी दोन घराणी परमेश्वराने निवडली ती त्यांना सोडून दिले आहेत काय? याप्रकारे त्यांच्या दृष्टीने पुन्हा राष्ट्र होऊ नये असे ते माझ्या लोकांस तुच्छ लेखतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:24
29 Iomraidhean Croise  

ते म्हणतात, “देवाने ह्याला सोडले आहे; ह्याच्या पाठीस लागा, ह्याला धरा; कारण ह्याला सोडवणारा कोणी नाही.”


ते म्हणतात, “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.”


कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात;


कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; तो आपले वतन सोडून देणार नाही.


एफ्राइमाचा मत्सर नाहीसा होईल, यहूदाचे वैरी उच्छेद पावतील, एफ्राईम यहूदाचा हेवा करणार नाही व यहूदा एफ्राइमाशी विरोध करणार नाही.


एफ्राईम यहूदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील; म्हणजे अश्शूरच्या राजाला तुझ्यावर आणील.”


मी म्हणालो, ‘हे सर्व केल्यावर तरी तिने माझ्याकडे परत यावे ना?’ पण ती आली नाही; तिची बेइमान बहीण यहूदा हिने हे पाहिले;


आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्राएल हिला जारकर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेइमान बहीण यहूदा हिला बिलकूल भीती वाटली नाही; तीही जाऊन व्यभिचार करू लागली.


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


“यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.”


परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे :


तरच याकोब व माझा सेवक दावीद ह्यांच्या संततीचा मी त्याग करीन आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या संततीवर सत्ता चालवण्यास ठेवणार नाही; मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्यांच्यावर दया करीन.”


कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध केलेल्या अपराधांनी त्याचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास त्यांचा देव, सेनाधीश परमेश्वर ह्याने सोडले नाही.


“दूर व्हा! अमंगळ लोकहो, दूर व्हा! दूर व्हा! शिवू नका!” असे त्यांनी त्यांना ओरडून म्हटले; ते पळून जाऊन भटकत राहिले तेव्हा राष्ट्रांतले लोक म्हणाले, “त्यांना आतापासून येथे वस्ती करायची नाही.”


अम्मोन वंशजांना म्हण, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, इस्राएल देश ओसाड करण्यात आला, यहूदाचे घराणे बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा तू ‘वाहवा’ असे म्हटलेस;


“मानवपुत्रा, सोर यरुशलेमेविषयी म्हणत आहे, ‘अहा! जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह माझ्याकडे वळला आहे; ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे;’


प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्यासंबंधाने शत्रू म्हणतात, ‘अहा! ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत;’


ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला; लोक त्यांच्याविषयी म्हणत की, ‘हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.’


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’


मी ह्या देशात, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन; त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील; ती ह्यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत; ह्यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan