Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्या दिवसांत यहूदाचा उद्धार होईल व यरुशलेम सुरक्षित वसेल आणि ‘परमेश्वर आमची नीतिमत्ता’ हे नाव तिला देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्या दिवसात यहूदाचे तारण होईल आणि यरूशलेम सुरक्षित राहील. कारण तिला परमेश्वर आमची धार्मिकता आहे या नावाने बोलवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्या दिवसात यहूदीयाचा बचाव होईल व यरुशलेम येथील लोक सुरक्षितपणे राहतील. याहवेह जे आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने संबोधित करण्यात येईल.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:16
20 Iomraidhean Croise  

इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.


त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’


परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.


पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन.


ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’


ते त्यात निर्भय राहतील; ते घरे बांधतील, द्राक्षाचे मळे लावतील आणि त्यांच्या सभोवतालच्या त्यांच्या द्वेष्ट्यांना मी न्यायदंड करीन तेव्हा ते निर्भयपणे वसतील; मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.”


बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल; शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून वाचेल व ज्या देशात अनेक राष्ट्रांतून जमा केलेले लोक पुनःपुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्राएल पर्वतांवर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील; तथापि त्या लोकांना राष्ट्रांतून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील.


ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”


हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे; परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे; यहूदाचे लोक, यरुशलेमनिवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएल लोक ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांना निरनिराळ्या देशात हाकून लावलेस, त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे.


ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे, “मुक्त करणारा सीयोनेतून येईल; तो याकोबापासून अभक्ती दूर करील;”


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


बन्यामिनाविषयी तो म्हणाला, ‘परमेश्वराचा हा प्रियजन त्याच्याजवळ सुरक्षित राहील; तो दिवसभर त्याच्यावर छाया करील, तो त्याच्या पाठीशी राहील.’


इस्राएल सुरक्षित राहतो; धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफाळत आहे, आणि त्याच्यावरचे आकाश दहिवर वर्षते.


आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.


आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून :


Lean sinn:

Sanasan


Sanasan