Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जे हे स्थळ ओसाड आहे व ज्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही त्याच्या सर्व नगरांत मेंढपाळ आपले कळप बसवण्यासाठी पुन्हा वाडे करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, या निर्जन स्थानात, जेथे आता मनुष्य व प्राणी कोणीही नाही. त्यातल्या सर्व नगरात कळप बसविणाऱ्या मेंढपाळांची वस्ती पुन्हा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “याहवेह असे म्हणतात: ‘कोणीही मनुष्य व पशू नसलेल्या या उजाड ठिकाणी—यातील सर्व नगरात कळपांना विश्रांती मिळण्यासाठी मेंढपाळांना कुरणे मिळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:12
17 Iomraidhean Croise  

माझ्या प्राणसख्या, मला सांग : तू आपला कळप कोठे चारतोस? दुपारी तो कोठे बसवतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे?


माझा धावा करणार्‍या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल.


यहूदाच्या नगरांतून, यरुशलेमेच्या परिसरातून बन्यामीन प्रांतांतून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पण करतील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतील.


ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरामेंढरांचे वत्स ह्यांकडे लोटतील; त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल; ह्यापुढे ते म्लान होणार नाहीत.


यहूदा व त्यातील सर्व नगरे ह्यांतले लोक शेतकरी व मेंढरांचे कळप घेऊन फिरणारे असे तेथे एकत्र राहतील.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे ह्यांची ह्या देशात पुन्हा खरेदी चालू होईल.’


आणि यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला तू असे सांग, ‘परमेश्वर म्हणतो, तू हा पट जाळून म्हटले, तू ह्यावर का लिहिले की बाबेलचा राजा येईलच व ह्या देशाचा विध्वंस करील आणि ह्यातून मनुष्य व पशू ह्यांचे निर्मूलन करील?”


माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांना बहकवले आहे; ते पहाडापहाडांतून भटकले आहेत; ते आपले विश्रांतिस्थान विसरले आहेत.


आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू ह्या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल, त्यात कोणी मनुष्य अथवा पशू राहणार नाही, ते कायमचे ओसाड होईल.’


तेव्हा लोक म्हणतील, ‘ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यांत वस्ती झाली आहे.’


“इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan