Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेथे पुन्हा आनंद व हर्षाचा शब्द ऐकू येईल. नवऱ्याची व नवरीची वाणी ऐकू येईल, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सर्वकाळची आहे. असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात उपकारस्तुतीचे अर्पण आणतील त्यांचा आवाज पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास परत उलटवून सुरुवातीला जसे होते तसे करीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्‍यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, “याहवेहला धन्यवाद द्या, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:11
47 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.


परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.


सैन्याबरोबर बाहेर जाताना ‘परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे,’ हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले.


मग हिज्कीया म्हणाला, “आता तुम्ही आपणांस परमेश्वराला समर्पण केले आहे तर जवळ येऊन परमेश्वराच्या मंदिरात यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा मंडळीने यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणली आणि जे उदार मनाचे होते त्यांनी होमार्पणे आणली.


कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.


अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले तेव्हा सर्व इस्राएल लोक ते पाहत राहिले; जमिनीवरच्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लववून नमन केले आणि “परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे” असे म्हणून त्यांनी त्याचे उपकारस्मरण केले.


त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यांना आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातांना जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यांना अनुकूल केले होते.


त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.


नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.


परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.


परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे.


ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.


मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.


कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.


हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे, व तू सिद्ध केलेले तारण आम्हांला दे.


मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.


परमेश्वराने उद्धरलेले जन परततील व जयजयकार करत सीयोनेस येतील; त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील; त्यांना आनंद व उल्लास प्राप्त होईल; दुःख व उसासे पळ काढतील.


पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.


तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत; कारण परमेश्वर सीयोनेस परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत.


यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, तुमच्या हयातीत, तुमच्या डोळ्यांपुढे ह्या ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन.


यहूदाच्या नगरांतून, यरुशलेमेच्या परिसरातून बन्यामीन प्रांतांतून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पण करतील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतील.


त्यांमधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन.


परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.


त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत.


कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”


बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”


तरच याकोब व माझा सेवक दावीद ह्यांच्या संततीचा मी त्याग करीन आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या संततीवर सत्ता चालवण्यास ठेवणार नाही; मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्यांच्यावर दया करीन.”


मी यहूदाचा बंदिवास व इस्राएलाचा बंदिवास उलटवीन व त्यांना पूर्ववत स्थापीन.


हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.


मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.


पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”


परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो.


सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर.


एफ्राईम वीरासारखा होईल, द्राक्षारसाने होते तसे त्यांचे हृदय हर्षित होईल; त्यांची मुले हे पाहून उल्लास पावतील; त्यांचे हृदय परमेश्वराच्या ठायी आनंदेल.


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांती ह्यांची आवड धरा.


त्यांची आबादानी केवढी! त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणांना आणि नवा द्राक्षारस तरुणींना धष्टपुष्ट करील.


वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.


म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’


‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan