Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वर म्हणतो, ह्या स्थलाविषयी तुम्ही म्हणता की, ‘हे ओसाड आहे, ह्यात माणसे व पशू ह्यांचा मागमूस नाही; यहूदाची नगरे व यरुशलेमेचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांत माणसे, रहिवासी व पशू ह्यांचे नाव नाही;’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर असे म्हणतो, या स्थानाविषयी तुम्ही आता म्हणता की हे ओसाड आहे. तेथे यहूद्याच्या नगरात कोणी माणसे व प्राणी नाहीत आणि यरूशलेमेचे रस्ते निर्जन झाले आहेत, माणसे व पशू नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “याहवेह असे म्हणतात: ‘या नगराविषयी तुम्ही म्हणता, “हे उद्ध्वस्त झालेले ठिकाण आहे, इथे ना लोक राहतात ना पशू.” तरी देखील वैराण झालेल्या यहूदीयाच्या नगरात व यरुशलेमच्या रस्त्यांवर पुन्हा ते स्वर ऐकू येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:10
9 Iomraidhean Croise  

कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.


हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे, व तू सिद्ध केलेले तारण आम्हांला दे.


‘हे मंदिर शिलोप्रमाणे होईल व हे नगर उजाड व निर्जन होईल,’ असा संदेश तू परमेश्वराच्या नामाने का दिलास?” मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले.


तरी आता ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता की, ‘ते तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे बाबेलच्या राजाच्या हाती जायचे आहे,’ त्याविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो,


ज्या ह्या देशाविषयी तुम्ही म्हणता की तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही, तो खास्द्यांच्या हाती गेला आहे, त्या ह्या देशात शेतांची खरेदी होऊ लागेल.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा करून त्यांना ह्या नगराकडे परत यायला लावीन; ते त्याबरोबर लढून ते घेतील व ते अग्नीने जाळतील; मी यहूदाची नगरे ओसाड व निर्जन करीन.”


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’


मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील.


“इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वत: आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan