Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्‍यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे माझ्या काकाचा मुलगा हानामेल, पहारेकऱ्यांच्या चौकात माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, बन्यामीन देशातल्या अनाथोथात जे माझे शेत आहे ते तू विकत घे. कारण वतन करून घेण्याचा व ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा अधिकार तुझा आहे. ते आपणासाठी विकत घे. तेव्हा मला कळले की हे परमेश्वराचे वचन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’ “तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:8
15 Iomraidhean Croise  

अब्याथार याजकाला राजा म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेतीवाडीत जाऊन राहा; तू मरणदंडास पात्र आहेस तरी मी आज तुला मारून टाकत नाही, कारण माझा बाप दावीद ह्याच्यासमक्ष तू परमेश्वर देवाचा कोश वाहत असायचास आणि माझ्या बापाला ज्या ज्या विपत्ती प्राप्त झाल्या त्यांचा वाटेकरी तू होत असायचास.”


मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”


बन्यामिनाच्या वंशाचे गिबा व त्याचे शिवार, अल्लेमेथ व त्याचे शिवार; आणि अनाथोथ व त्याचे शिवार; त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.


बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :


त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्‍यांच्या चौकात बंदीमध्ये होता.


तरी, हे प्रभू परमेश्वरा, हे नगर खास्द्यांच्या हाती लागत असता तू मला म्हणालास, ‘पैसा देऊन हे शेत आपल्यासाठी विकत घे व साक्षी बोलाव.”’


पाहा, तुझा चुलता शल्लूम ह्याचा पुत्र हानामेल तुझ्याकडे येऊन म्हणेल, ‘अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते सोडवून घेण्याचा हक्क तुझा आहे.’


यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात अजून बंदीत असता परमेश्वराचे वचन त्याला दुसर्‍यांदा प्राप्त झाले की,


लोकांतला आपला वाटा मिळवावा म्हणून यिर्मया यरुशलेमेहून बन्यामीन प्रांतात जाण्यास निघाला.


मला आज्ञा झाली तसे मी केले; देशांतरास लागणारी सामग्री नेतात तसे मी भरदिवसा आपले सामानसुमान बाहेर काढले व संध्याकाळी मी तटास आरपार भोक पाडले; अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले व त्यांच्यादेखत ते मी खांद्यावर घेतले.


त्या दिवशी ती मोडली; तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते असे त्या कळपांत असलेले अतिशय दुबळे समजले की, हे परमेश्वराचे वचन आहे.


ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan