Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पाहा, तुझा चुलता शल्लूम ह्याचा पुत्र हानामेल तुझ्याकडे येऊन म्हणेल, ‘अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते सोडवून घेण्याचा हक्क तुझा आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पाहा, तुझा काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि म्हणेल जे माझे शेत अनाथोथात आहे ते तू आपल्यासाठी विकत घे, कारण ते खरेदी करण्याचा अधिकार तुझा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:7
15 Iomraidhean Croise  

परमेश्वर अहीयाला म्हणाला, “यराबामाची स्त्री आपल्या मुलाविषयी विचारण्यासाठी येत आहे; तो आजारी आहे; तू तिला असे सांग; आपण कोणी दुसरी स्त्री आहोत असे सोंग करून ती आत येईल.”


बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :


अनाथोथचे जे लोक माझ्या जिवावर टपले असून म्हणतात की, “तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नकोस, देशील तर आमच्या हातून मरशील,” त्यांच्याविरुद्ध परमेश्वर बोलला आहे.


यिर्मया म्हणाला, “परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्‍यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.


जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकू नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरे आहात;


म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडवून घेण्याची तुम्ही तरतूद करावी.


तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला भाग सोडवून घ्यावा.


त्यांच्या नगराच्या शिवारातील समाईक जमीन विकायची नाही; ते त्यांचे कायमचे वतन होय.


त्याचा चुलता, त्याचा चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा आप्त ह्यांना त्याला सोडवता येईल; अथवा तो स्वतःच धनवान झाला तर त्याला स्वतःची सुटका करवून घेता येईल.


“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, तुम्ही आपल्या ताब्यात मिळणार्‍या वतनातून लेव्यांना राहण्यासाठी नगरे द्यावीत आणि त्या नगरांच्या आसपासची शिवारेही त्यांना द्यावीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan