यिर्मया 32:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 “त्यांचे तोंड फिरविण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, जरी मी त्यांना अति उत्सुकतेने शिकविले. मी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एकानेही बोध स्विकारण्यास माझे ऐकले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्यांनी माझ्याकडे त्यांचे मुख नव्हे तर पाठ फिरविली आहे; परत परत मी त्यांना शिक्षण दिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही किंवा माझ्या शिस्तीस प्रतिसाद दिला नाही. Faic an caibideil |
मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.