यिर्मया 32:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आणि ह्या नगराबरोबर युद्ध करणारे खास्दी येऊन ह्या नगराला आग लावून जाळून टाकतील, आणि ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी बालमूर्तीला धूप जाळला व मला चिडवण्यासाठी अन्य देवांना पेयार्पणे वाहिली ती घरेही ते जाळून टाकतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तिही जाळून टाकतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील. Faic an caibideil |