Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि त्यांनी प्रवेश केला आणि त्याचा ताबा घेतला. पण त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही किंवा तुझ्या नियमाचे आज्ञापालन केले नाही. त्यांना तू जे करण्याची आज्ञा दिली होती त्यांनी काहीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर ही सर्व संकटे आणली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:23
32 Iomraidhean Croise  

आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहोत; आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत; आज आमची स्थिती अशीच आहे.


आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.


त्यांनी देवाचा करार पाळला नाही; त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास ते कबूल नव्हते;


मी तुम्हांला सुपीक भूमीवर तिचा उपज खाण्यासाठी व तिची संपत्ती भोगण्यासाठी आणले, पण तुम्ही येऊन माझा देश विटाळला, माझे वतन तुम्ही अमंगळ केले आहे.


त्यांना सांग की, ‘परमेश्वर असे म्हणतो : तुम्ही माझे ऐकणार नाही, मी तुमच्यापुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही,


ते अजून नम्र झाले नाहीत, त्यांना भीती वाटत नाही, व तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी लावून दिलेले आपले नियमशास्त्र व आपले विधी ह्याप्रमाणे ते चालत नाहीत.


पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले.


“परमेश्वर न्यायपरायण आहे, मी तर त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आहे; अहो सर्व लोकहो, आता ऐका, माझे दुःख पाहा; माझ्या कुमारी व माझे तरुण बंदिवान होऊन गेले आहेत.


यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.


तसेच रानात मी त्यांच्या वंशजांना म्हणालो, तुम्ही आपल्या वडिलांच्या नियमांप्रमाणे चालू नका, त्यांच्या निर्णयांना अनुसरू नका, व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळू नका.


तरीपण ते वंशजही मला फितूर झाले; जे पाळल्याने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत; ते माझे निर्णय त्यांनी टाकून दिले; माझे शब्बाथ त्यांनी भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.


तरीपण ते माझ्याशी फितूर झाले व माझे ऐकेनात; त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत; मिसर देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत; तेव्हा मिसर देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.


त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.”


मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.


कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.”


कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो.


इस्राएल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले.


तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हांला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हांला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan