Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजगृहातील पहारेकर्‍यांच्या चौकात बंदीमध्ये होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:2
15 Iomraidhean Croise  

त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुशलेमेवर चढाई करून आला; त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारले.


कोट वळसा घेतो त्यासमोर गारद्यांच्या अंगणाजवळ राजमंदिराबाहेर असलेल्या उंच बुरुजाची डागडुजी पलाल बिन उजई ह्याने केली. त्याच्या शेजारी पदाया बिन परोश ह्याने डागडुजी केली.


तू माझ्या परिचितांना माझ्यापासून दूर केले आहेस, त्यांना माझा वीट येईल असे तू मला केले आहेस; मी कोंडलेला आहे, माझ्याने बाहेर निघवत नाही.


यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने त्याला अटकेत टाकले तेव्हा तो त्याला म्हणाला होता की, “तू असा संदेश का देतोस की परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देतो, व तो ते हस्तगत करील;


तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्‍यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.


यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात अजून बंदीत असता परमेश्वराचे वचन त्याला दुसर्‍यांदा प्राप्त झाले की,


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सर्व सैन्य, त्याच्या सत्तेखाली असलेली जगातली सर्व राज्ये व सर्व लोक ह्यांनी यरुशलेमेबरोबर व तिच्या सर्व नगरांबरोबर युद्ध चालवले, तेव्हा यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :


तेव्हा यिर्मयाने बारुखाला आज्ञा केली की, “मला प्रतिबंध आहे, मला परमेश्वराच्या मंदिरात जाता येत नाही;


सरदारांनी यिर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेवले, त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता.


मग सिद्कीया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकर्‍यांच्या चौकात ठेवले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक भाकर मिळत असे. ह्याप्रमाणे यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


त्या वेळी यिर्मयाचे लोकांत जाणेयेणे होते, कारण त्याला अद्यापि बंदिशाळेत टाकले नव्हते.


तेव्हा त्यांनी यिर्मयाला दोरांनी विहिरीतून वर ओढून घेतले. मग यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.


मग राजपुत्र मल्कीया ह्याची पहारेकर्‍यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले; त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला.


आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan