Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:19
35 Iomraidhean Croise  

तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर, आणि त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टांना दुष्ट ठरव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे.


परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो.


कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते; त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो.


परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.


परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.


शिवाय, हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे; कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.


पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की,


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो.


मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे.


सगळ्या बर्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.


हेही सेनाधीश परमेश्वराकडून घडते, त्याची बुद्धी आश्‍चर्यकारक व त्याचे चातुर्य थोर आहे.


परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे?


ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्‍यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत; ते मला गुप्त नाहीत; त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही.


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.


आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण केले; त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे; हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निःसंशय हाच आहे.”


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी : ती दिमिष्कास पोचवून तेथे स्थिर होईल; कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्राएलाच्या सर्व वंशांकडे आहे;


मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्या वेळी ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.’


कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


“‘पाहा, मी’ लवकर1 ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan