Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 32:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व साक्षी बोलावून त्याला पैसा तागडीने तोलून दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 नंतर मी खरेदीखतावर सही केली आणि मोहोरबंद केले आणि ते साक्षीला साक्षीदार ठेवले. मग मी तागडीने रुपे मोजले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 32:10
23 Iomraidhean Croise  

अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी चारशे शेकेल रुपे त्याला तोलून दिले.


आणि ते शेत गुहेसहित कबरस्तान व्हावे म्हणून हेथींकडून अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले.


माझे पातक थैलीत घालून मोहरबंद केले आहेस; माझा अधर्म तू वज्रलेप करून ठेवतोस.


आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.


तर आता चल, त्यांच्यासमक्ष हे पाटीवर लिही, टिपून ठेव म्हणजे ते पुढील पिढ्यांसाठी युगानुयुग राहील.


तेव्हा कोणी म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे;’ कोणी याकोबाचे नाव घेईल; कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा, असे लिहील आणि इस्राएल हे उपनाव घेईल.”


आणि माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यासमक्ष व ज्यांनी खरेदीखतावर साक्षी घातल्या होत्या त्यांच्यासमक्ष पहारेकर्‍यांच्या चौकात जे यहूदी बसले होते त्या सर्वांसमक्ष ते खरेदीखत बारूख बिन नरीया बिन महसेया ह्याच्या स्वाधीन केले.


तरी, हे प्रभू परमेश्वरा, हे नगर खास्द्यांच्या हाती लागत असता तू मला म्हणालास, ‘पैसा देऊन हे शेत आपल्यासाठी विकत घे व साक्षी बोलाव.”’


बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”


हा जो अहोरात्रीचा3 दृष्टान्त सांगितला तो खरा आहे; हा दृष्टान्त गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे.”


मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्‍कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.


ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे.


नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”


त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला.


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे.


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.


‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय?


तेव्हा ते पुरुष तेथून निघून देशभर फिरले व त्यातील नगरांप्रमाणे त्याच्या सात वाट्यांचे वर्णन त्यांनी वहीत लिहिले व ते शिलो येथील छावणीत यहोशवाकडे आले.


मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला,


त्यांना असे सांगण्यात आले की, ‘पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला’ उपद्रव करू नये; तर ज्या माणसांच्या ‘कपाळांवर’ देवाचा ‘शिक्का’ नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.


इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan