Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 पाहा, मी त्यांना उत्तरेच्या देशांतून आणीन, त्यांना पृथ्वीच्या दिगंताहून जमा करीन; त्यांच्यामध्ये आंधळे व पांगळे, गर्भवती व प्रसूतिवेदना लागलेल्या असतील; मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पाहा, मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून आणीन, पृथ्वीच्या अगदी शेवटच्या ठिकाणाहून मी त्यांना एकत्र करीन. त्यांच्यामध्ये आंधळे आणि पंगू, गर्भवती आणि ज्या कोणी त्यांच्या प्रसूतीची वेळ आली असेल त्याही त्यांच्याबरोबर असतील. त्यांची मोठी मंडळी इकडे परत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन आणि पृथ्वीच्या दिगंतापासून गोळा करेन. त्यांच्यात आंधळे व पांगळे, गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या माता असतील; फार मोठा समुदाय परत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:8
29 Iomraidhean Croise  

आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे.


हे आमच्या तारणार्‍या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.


त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.


मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या;


पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे.


परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


तर ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना उत्तर देशातून व ज्या देशांत त्यांना त्याने हाकून लावले होते त्या देशांतून आणले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ’ असे म्हणतील; कारण जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यात त्यांना मी परत आणीन.


मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील.


तर ‘उत्तर देशांतून व ज्या ज्या देशांत इस्राएल घराण्याच्या संतानाला हाकून लावले होते त्यांतून ज्याने त्यांना आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील.”


परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.


जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.


त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्याबरोबर चालेल, ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील.


मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुम्हांला राष्ट्रांतून आणीन, ज्या देशात तुमची पांगापांग झाली आहे त्यांतून तुम्हांला एकत्र करीन;


मी तुम्हांला राष्ट्रांतून बाहेर आणीन व ज्या देशांत तुमची पांगापांग झाली आहे त्यांतून तुम्हांला जमा करीन, तेव्हा मी सुगंधाप्रमाणे तुमचा स्वीकार करीन आणि तुमच्या ठायी माझी पवित्रता विदेशी राष्ट्रांना प्रकट होईल.


जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन.


मी त्यांना राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशांतून त्यांना जमा करीन; मी त्यांना स्वदेशी परत आणीन; मी इस्राएलाच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ व देशातल्या सर्व वसतिस्थानांत त्यांना चारीन.


मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन; पण लठ्ठ व बलिष्ठ ह्यांचा मी नाश करीन; त्यांना मी यथान्याय चारीन.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत मी लंगड्यांना जमा करीन; हाकून दिलेल्यांना व मी ज्यांना पिडले त्यांना एकत्र करीन.


पाहा, त्या समयी तुला पिडणार्‍या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन.


अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्‍ही वार्‍यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल,


त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू; आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे.” त्याने त्याला म्हटले, “माझी कोकरे चार.”


कारण सुज्ञ असा जो तू त्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना?


तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणील;


बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.


म्हणून ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा,’


कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan