Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 शोमरोनाच्या डोंगरावर तू पुन्हा द्राक्षमळे लावशील; लावणारे लावतील व त्यांची फळे त्यांना लाभतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तू पुन्हा शोमरोनाच्या डोंगरावर द्राक्षमळ्यांची लागवड करशील. शेतकरी लागवड करतील आणि त्याच्या फळांचा चांगला उपयोग होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; शेतकरी ते मळे लावतील व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:5
15 Iomraidhean Croise  

ते शेते पेरतात, व द्राक्षांचे मळे लावतात आणि त्यांना पीक मिळते.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे ह्यांची ह्या देशात पुन्हा खरेदी चालू होईल.’


ते त्यात निर्भय राहतील; ते घरे बांधतील, द्राक्षाचे मळे लावतील आणि त्यांच्या सभोवतालच्या त्यांच्या द्वेष्ट्यांना मी न्यायदंड करीन तेव्हा ते निर्भयपणे वसतील; मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर त्यांचा देव आहे.”


पण इस्राएलाचे पर्वतहो, तुमच्यावरील वृक्षांना फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांना फळे द्याल असे लवकरच घडून येईल.


मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.


दक्षिणेतील लोक एसावाच्या पहाडाचा ताबा घेतील; तळवटी तले लोक पलिष्ट्यांवर सत्ता चालवतील; ते एफ्राइमाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र ताब्यात घेतील व बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.


ह्यामुळे मी शोमरोनास शेतातील दगडांच्या ढिगारासारखे करीन; तिला द्राक्षीच्या मळ्यासारखे करीन; मी तिचे दगड खोर्‍यात फेकून देईन, तिचे पाये उघडे करीन.


ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजार्‍यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल.”


द्राक्षमळा लावून त्याचे प्रथमफळ खाल्ले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी त्याचे फळ खाईल.


तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील, पण दुसराच तिचा उपभोग घेईल; तू घर बांधशील पण त्यात राहणार नाहीस; तू द्राक्षमळा लावशील, पण त्याचे फळ तुला मिळणार नाही.


दाविदाने याजकाला म्हटले, “आम्ही वास्तविक आज तीन दिवस स्त्रियांपासून दूरच आहो; आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषांची पात्रे पवित्र होती ती आज कितीतरी जास्त असली पाहिजेत?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan