Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्‍यांनी भूषित होशील व उत्सव करणार्‍यांबरोबर नृत्य करशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी तुला पुन्हा उभारेन, आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील. तू पुन्हा तुझे खंजीर घेशील आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:4
31 Iomraidhean Croise  

तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे : सीयोनाची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून, आपले मस्तक हालवते.


ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत. डफ व वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.


तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस;


तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ;


कारण देव सीयोनेचे तारण करील, तो यहूदाची नगरे बांधील; लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


आणि असे होईल की डफांचा व वीणांचा नाद होत असता परमेश्वर त्यांच्यावर नेमलेल्या दंडाचा प्रत्येक प्रहार करील व हात खालीवर करून त्यांच्याशी युद्ध करील.


तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे की, ‘सीयोनेची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तू पाठमोरा झालेला पाहून आपले मस्तक हलवते.


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


तू त्यांना हे वचन सांग, ‘माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुंवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्नभिन्न झाली आहे.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, राष्ट्रांमध्ये चौकशी करून पाहा, अशा गोष्टी कोणी कधी ऐकल्या आहेत काय? इस्राएलाच्या कुमारीने अति घोर कर्म केले आहे.


मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.


त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील; वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील; मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन, मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन.


वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये.


“परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत परमेश्वरासाठी हानानेलाच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील;


मी यहूदाचा बंदिवास व इस्राएलाचा बंदिवास उलटवीन व त्यांना पूर्ववत स्थापीन.


हे कुमारिके, मिसरकन्ये, चढून गिलादास जा, तेथे मलम घे! तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहेस; तुझ्या घावाला मलमपट्टी नाही.


प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.


मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?


“इस्राएल-कुमारी पडली आहे; ती पुन्हा उठायची नाही; तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे; तिला उठवणारा कोणी नाही.”


दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन;


आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू;


‘ह्यानंतर मी परत येईन, व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन;


इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मुलगी नव्हती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan