Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 “परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:33
36 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केलीस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास.


आम्ही त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याने आमच्या पूर्वजांना दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावेत म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो.


त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत.


हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”


महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल.


ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.


हे नीती जाणणार्‍यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणार्‍यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका.


परमेश्वर म्हणतो, “माझा तर त्यांच्याशी हाच करार : तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या मुखातून, तुझ्या संतानांच्या मुखांतून व तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखांतून आतापासून पुढे सर्वकाळ निघून जाणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.”


“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे;


मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील.


तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.”


परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व वंशांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”


ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.


त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांचे हित व्हावे म्हणून त्यांनी सर्वदा माझे भय बाळगावे ह्यासाठी मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.


आणि मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत.


माझा निवासमंडप त्यांच्यावर राहील; मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल.


मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’


येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.”


“जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन, तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल.”


माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो;


शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर ‘मांसमय अंत:करणरूपी पाट्यांवर’ ‘कोरलेले’, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात.


तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील.


बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे ह्याची तुम्हांला गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हांला देवानेच शिकवले आहे;


परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”


कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील.


आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’


जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan