Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 “मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. मी जरी त्यांचा पती होतो, तरी त्यांनी माझा करार मोडला.” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:32
43 Iomraidhean Croise  

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन दगडी पाट्या ठेवल्या होत्या; त्यांखेरीज त्यात दुसरे काही नव्हते.


तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस.


कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते, शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही.


म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे;


ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”


आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या.


पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.


कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”


कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.


तू त्यांना सांग, परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे.


ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन;


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


तेव्हा ते उत्तर देतील की, ‘त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याचा करार मोडला व अन्य देवांना भजून त्यांची सेवा केली म्हणून.”’


परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन.


परमेश्वर म्हणतो, “त्या काळी मी इस्राएलाच्या सर्व वंशांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”


“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो तुमचे पूर्वज मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले तेव्हा मी त्यांच्याबरोबर करार केला की,


‘कोणी तुझ्या इब्री बांधवापैकी असून त्यास तुला विकले असले तर सात वर्षांच्या शेवटी प्रत्येकाने आपल्या बंधूला बंधमुक्त करावे; त्याने सहा वर्षे तुझे दास्य केल्यावर त्याला तू मुक्त करून रवाना करावेस.’ पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व आपला कान दिला नाही.


मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.


तुम्हांला काठीखालून चालवून कराराने बद्ध करीन;


त्यांतल्या थोरलीचे नाव अहला होते व तिच्या बहिणीचे नाव अहलीबा होते; त्या माझ्या झाल्या आणि त्यांना पुत्र व कन्या झाल्या. त्यांची नावे पाहिली असता अहला (तिचा डेरा) म्हणजे शोमरोन व अहलीबा (माझा डेरा तिच्या ठायी आहे) म्हणजे यरुशलेम.


इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले.


“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;


मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”


माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,


तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यांत थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?”


वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.


तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला मला काय सांगायचे आहे?”


कारण तुमच्याविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.


आणि तुम्ही रानातही पाहिले की, येथवर येऊन पोहचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने, मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हांला नेले.’


जो करार होरेबात परमेश्वराने इस्राएल लोकांशी केला होता त्याखेरीज जो करार मवाब देशात त्याने त्यांच्याशी करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्या कराराची वचने ही.


नियमशास्त्राच्या ह्या ग्रंथात जो करार लिहिलेला आहे त्यातल्या सर्व शापवचनांप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाइटासाठी त्याला इस्राएलाच्या सर्व वंशांतून वेगळे करील.


तेव्हा ते, किंबहुना सर्व राष्ट्रांतले लोक विचारतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय?’


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील.


कारण ज्या देशात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश देण्याची शपथ मी त्यांच्या पूर्वजांशी वाहिली होती, त्यात मी त्यांना नेऊन पोहचवल्यावर ते पोटभर खाऊन माजतील, आणि मग अन्य देवांकडे वळून त्यांची सेवा करतील आणि मला तुच्छ लेखून माझा करार मोडतील.


आपला देव परमेश्वर ह्याने होरेबात आपल्याबरोबर करार केला.


हा करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांबरोबर केला नाही, तर आज जे आपण सर्व जिवंत आहोत त्या आपल्याबरोबर केला आहे.


मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत, आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan