Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मग असे होईल की, उपटायला व पाडायला, मोडायला व नाशाला, व पीडायला जशी मी त्यांच्यावर नजर ठेवत असे, तशी बांधायला व लावायला मी त्यांच्यावर नजर ठेवीत जाईन.” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:28
24 Iomraidhean Croise  

“पूर्वीचे महिने मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते! त्या दिवसांत देव माझे रक्षण करीत असे.


कारण परमेश्वराने सीयोन पुन्हा बांधली आहे, तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे;


परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो; इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो.


कारण देव सीयोनेचे तारण करील, तो यहूदाची नगरे बांधील; लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल.


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.”


मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.


मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.


कारण परमेश्वर म्हणतो, ज्या प्रकारे मी ह्या लोकांवर हे सर्व मोठे अरिष्ट आणले आहे त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाचे जे मी बोललो ते सर्व त्यांना प्राप्त करून देईन.


ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे.


पाहा, त्यांचे अभीष्ट नव्हे तर अनिष्ट व्हावे म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवीन; आणि मिसर देशात असलेल्या यहूदातल्या सर्व लोकांचा अंत होईपर्यंत ते दुष्काळाने व तलवारीने क्षय पावतील.


ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.


तेव्हा तिच्यावर क्रोध होऊन तिला उपटून जमिनीवर पाडण्यात आले; पूर्वेकडील वार्‍यामुळे तिची फळे करपली; तिचे मजबूत धुमारे मोडून वाळून गेले; अग्नीने खाक केले.


मी तुमच्यावर माणसांची, इस्राएलाच्या एकंदर सर्व घराण्याची संख्या वाढवीन; नगरे वसतील; पडीत स्थळे बांधून काढतील.


ह्यास्तव परमेश्वराने विपत्तीवर नजर ठेऊन ती आमच्यावर आणली आहे; कारण आमचा देव परमेश्वर जी काही कृत्ये करतो ती न्याय्य आहेत, पण आम्ही त्याची वाणी ऐकली नाही.


हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.


दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन;


मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.


कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजले ह्याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो;


त्याप्रमाणे ह्या दिवसांत यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे; भिऊ नका;


‘ह्यानंतर मी परत येईन, व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन;


तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांबाबतीत तुझी समृद्धी करील; परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan