Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी इस्राएलाच्या घराण्यात व यहूदाच्या घराण्यात मनुष्यबीज व पशुबीज पेरीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 परमेश्वराचे म्हणणे असे आहे. “पाहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी यहूदाच्या व इस्राएलाच्या घराण्यांत मनुष्यबीज आणि पशुबीज पेरीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:27
8 Iomraidhean Croise  

पण दरिद्र्यांस क्लेशांतून मुक्त करून तो उच्च स्थानी ठेवतो, त्यांची कुटुंबे कळपासारखी वाढवतो.


त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत.


मी तुमच्यावर माणसांची, इस्राएलाच्या एकंदर सर्व घराण्याची संख्या वाढवीन; नगरे वसतील; पडीत स्थळे बांधून काढतील.


मनुष्य व पशू ह्यांची संख्या मी तुमच्यावर वाढवीन, ते वृद्धी पावून फलद्रूप होतील; पूर्वीच्या काळाप्रमाणे तुमच्यावर वस्ती होईल, आणि सुरुवातीला केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


कारण पाहा, मी तुम्हांला अनुकूल आहे, मी तुमच्याकडे वळेन व तुमच्यावर नांगरणी-पेरणी होईल.


मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”


मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन; दूर देशात ते माझे स्मरण करतील; ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील.


तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांबाबतीत तुझी समृद्धी करील; परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan