Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तू आपल्यासाठी रस्त्यांवर खुणा कर. तू आपल्यासाठी मार्गदर्शक खांब ठेव. तू जो योग्य मार्ग घेतला, त्या मार्गावर आपले लक्ष ठेव. हे इस्राएला! कुमारी, तू आपल्या नगराकडे परत ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “जाताना वाटेवर खुणा कर; दिशादर्शक लाव. तू गेलीस तो महामार्ग ध्यानात ठेव, त्या मार्गावर लक्ष ठेव. हे इस्राएली कुमारी, परत ये, तू आपल्या नगरांमध्ये परत ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:21
23 Iomraidhean Croise  

ह्याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्यारुप्याचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो.


इस्राएलाच्या सर्व वंशांतले जे लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या भजनी मनोभावे लागले होते ते सर्व आपल्या वडिलांचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर बली अर्पण करण्यासाठी लेव्यांच्या मागून यरुशलेमेस आले.


यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले.


जुलूमजबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका; संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका.


ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य!


ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


अशी वाणी झाली की, “भर घाला, भर घाला, मार्ग तयार करा; माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका.”


बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा.


जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन.


हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्‍यांनी भूषित होशील व उत्सव करणार्‍यांबरोबर नृत्य करशील.


हे कुमारिके, मिसरकन्ये, चढून गिलादास जा, तेथे मलम घे! तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहेस; तुझ्या घावाला मलमपट्टी नाही.


ते सीयोनाची वाट विचारतील, आपली तोंडे इकडल्या रस्त्यांकडे करून म्हणतील, ‘चला, शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाफ करू.’


जे तुम्ही तलवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका! दुरून परमेश्वराचे स्मरण करा, यरुशलेम आपल्या मनात वागवा.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’


तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.”


आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा.


मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन; दूर देशात ते माझे स्मरण करतील; ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील.


मग तो त्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी आज मी तुम्हांला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा; ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan