Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो; म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 एफ्राईम माझे बहुमूल्य मुल नाही काय? तो माझा प्रिय मोहक मुलगा नाही का? कारण जरी कधी मी त्याच्याविरुध्द बोललो, तरी खचित मी त्यास आपल्या मनात प्रेमाने आठवण करीतच असतो. याप्रकारे माझे हृदय त्याच्यासाठी कळवळते. मी खरोखर त्याच्यावर दया करीन. असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, तरी मला आताही त्याची आठवण येते. म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; मला त्याची अत्यंत दया येते.” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:20
27 Iomraidhean Croise  

आपल्या भावासाठी योसेफाची आतडी तुटू लागली, कोठेतरी जाऊन रडावेसे त्याला झाले म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला.


तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका.” दुसरी स्त्री म्हणाली, “तो न माझा न तुझा, त्याचे दोन भाग करा.”


जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्‍यांवर ममता करतो.


कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.


माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला, तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.


ह्यामुळे माझी आतडी मवाबासाठी, माझे काळीज कीर-हरेसासाठी वीणेप्रमाणे नाद करीत आहे.


ह्यामुळे परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावील; तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे.


जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, ‘हे मार्ग सोडून जाणार्‍या इस्राएले, मागे फीर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुझ्याकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.


मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रांतील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे असे मला वाटले होते; तुम्ही मला, माझ्या बापा, असे म्हणाल, मला अनुसरायचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटले होते.


ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.


तरच याकोब व माझा सेवक दावीद ह्यांच्या संततीचा मी त्याग करीन आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या संततीवर सत्ता चालवण्यास ठेवणार नाही; मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्यांच्यावर दया करीन.”


ह्यामुळे मवाबासाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे, कीर-हरेसच्या लोकांसाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे; त्याने संपादिलेले विपुल धन लयास गेले आहे.


आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.


इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे;


कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ मग ते आनंदोत्सव करू लागले.


तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”’


आपल्या लोकांचा आश्रय तुटला आहे, बद्ध किंवा मुक्त असा कोणी उरला नाही, हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल.


माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.


मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan