Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 31:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी एफ्राइमास खरोखर असा विलाप करताना ऐकले आहे की, ‘बेबंद वासरासारखा जो मी, त्या मला तू शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली; तू मला वळव म्हणजे मी वळेन; कारण हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 31:18
54 Iomraidhean Croise  

पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस;


परमेशाने मला जबर शासन केले; तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.


मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे.


हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो.


माझे दिवस तुझ्या हाती आहेत; माझ्या वैर्‍यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणार्‍यांपासून मला सोडव.


निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत.


हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.


हे देवा, तू आम्हांला परत आण; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.


हे सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.


हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण; आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर.


हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य;


घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला बडगा.


पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही


माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस;


तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


तुझे पुत्र मूर्च्छित झाले आहेत, पाशात सापडलेल्या हरिणाप्रमाणे रस्त्यांच्या नाक्यानाक्यांनी ते पडले आहेत; ते परमेश्वराच्या क्रोधाने, तुझ्या देवाच्या धमकीने ग्रासले गेले आहेत.


त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्‍यांपुढे गप्प राहणार्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही.


तरी तू आमचा पिता आहेस; अब्राहाम आम्हांला जाणत नाही; इस्राएल आम्हांला ओळखत नाही, तरी हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आमचा त्राता हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे.


तथापि लोक आपले ताडन करणार्‍यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत.


हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन; मला तार म्हणजे मी तरेन; कारण तू माझा स्तवनविषय आहेस.


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


आपण आपल्या लज्जेत लोळू या, आमची अप्रतिष्ठा आम्हांला झाको; कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर ह्याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही.”


कारण असा दिवस येत आहे की त्यात एफ्राईम डोंगरावर जागल्ये ओरडून सांगतील, ‘अहो उठा, आपण सीयोनेस आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे जाऊ.”’


ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.


हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.


हे परमेश्वरा, तू आम्हांला आपणांकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हांला पुन्हा आण.


ज्या तुमच्या मार्गांनी व ज्या तुमच्या सर्व कर्मांनी तुम्ही आपणांस विटाळले, त्यांचे स्मरण तुम्हांला होईल व तुम्ही जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट मानाल.


मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली आहे; तरी आपल्या अधर्मापासून परावृत्त व्हावे व तुझ्या सत्याचा उमज पडावा म्हणून आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याची काकळूत केली नाही;


एफ्राईम शिकवलेली कालवड आहे, तिला मळणी करण्याची आवड आहे; मी तिच्या सुंदर मानेवर जूं ठेवीन, मी एफ्राइमाला जुंपीन; यहूदा नांगरील; याकोब कोळपील.


कारण इस्राएल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे; आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यांना चारील.


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.


तिने वचन मानले नाही, बोध घेतला नाही; परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही.


तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले; ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली.


तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.”


पश्‍चिम बाजूस एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; एफ्राईम वंशाचा सरदार अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा हा असावा;


‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”


मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.


देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”


कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे.


आणि तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? “माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस;


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan