Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 “परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण परमेश्वर हे म्हणाला, “आम्ही दहशतीने थरथर कापणाऱ्याची वाणी ऐकली आहे शांतीची नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “याहवेह म्हणतात: “ ‘त्यांचा भयभीत आक्रोश ऐकू येत आहे— शांती नव्हे, तर दहशत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:5
22 Iomraidhean Croise  

त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.


आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


मेंढपाळांची आरोळी ऐका! कळपाच्या प्रमुखांची हायहाय ऐका! कारण परमेश्वर त्यांचे कुरण उद्ध्वस्त करीत आहे.


परमेश्वराने इस्राएल व यहूदा ह्यांच्याविषयी वचने सांगितली ती ही :


माझ्या दृष्टीस हे का पडत आहे? ते दहशत बसली म्हणून मागे फिरले आहेत. त्यांचे वीर पराभूत झाले आहेत, ते पळ काढत आहेत, मागे पाहत नाहीत; चोहोकडे भीतीच भीती आहे, असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर असे म्हणतो की : “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे.


माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.


“त्याच्या घोड्यांचे फुरफुरणे दानातील नगरांतून ऐकू येते; त्याच्या वारूंच्या मोठ्या खिंकाळण्यांनी सर्व भूमी हादरत आहे; ते येऊन देश व त्यातील सर्वस्व, नगर व त्यातील रहिवासी ह्यांना ग्रासून टाकतात.


पाहा, दूर देशातून माझ्या लोकांच्या कन्येची आरोळी ऐकू येते की, “सीयोनेत परमेश्वर नाही ना? त्यात तिचा राजा नाही ना?” “त्यांनी आपल्या मूर्तींनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडवले आहे?”


कारण सीयोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे; ‘आम्हांला कसे नागवले आहे! आमची कशी फजिती उडाली आहे! आम्ही देश त्यागला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडली आहेत.”’


तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”


ते तर राजांना कसपट समजतात व अधिपतींना कवडीमोल मानतात. कोणताही किल्ला असला, तरी तो ते तृणवत गणतात, कारण ते मातीचा ढीग रचून किल्ला सर करतात.


कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan