Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:3
45 Iomraidhean Croise  

इस्राएल लोक आपापल्या नगरांमध्ये राहू लागल्यावर सातवा महिना सुरू झाला तेव्हा लोक एकचित्त होऊन यरुशलेमेत जमा झाले.


तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळांचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी ह्या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यांना रडू कोसळले व त्यांच्यातले पुष्कळ जण हर्षभराने जयघोष करू लागले.


यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात जरूब्बाबेल बिन शल्तीएल, येशूवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला; वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले.


हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हांला बंदिवासातून परत आण.


देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाची मुक्ती येवो. देव आपल्या लोकांचे दास्य उलटवील तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.


तर ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना उत्तर देशातून व ज्या देशांत त्यांना त्याने हाकून लावले होते त्या देशांतून आणले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ’ असे म्हणतील; कारण जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यात त्यांना मी परत आणीन.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.


तथापि जे कोणी बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान देतील व त्याची सेवा करतील त्यांना मी त्यांच्याच देशात राहू देईन; ते शेती करतील व देशात वस्ती करतील,” असे परमेश्वर म्हणतो.


ती बाबेलास नेण्यात येतील व मी त्यांचा समाचार घेईपर्यंत ती तेथेच राहतील; मग मी ती तेथून घेऊन ह्या स्थली परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो.”


परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन.


परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.


त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्याबरोबर चालेल, ते उत्तरेकडील देशातून निघून एकत्र होतील व तुमच्या पूर्वजांना मी वतन करून दिलेल्या देशात येतील.


परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.


परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेर्‍यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील, आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल.


परमेश्वराने इस्राएल व यहूदा ह्यांच्याविषयी वचने सांगितली ती ही :


परमेश्वर असे म्हणतो, “तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर; कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल; ते शत्रूंच्या देशांतून परत येतील, असे परमेश्वर म्हणतो.


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!


परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी इस्राएलाच्या घराण्यात व यहूदाच्या घराण्यात मनुष्यबीज व पशुबीज पेरीन.


परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;


“परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत परमेश्वरासाठी हानानेलाच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील;


पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन.


बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”


तरच याकोब व माझा सेवक दावीद ह्यांच्या संततीचा मी त्याग करीन आणि दाविदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या संततीवर सत्ता चालवण्यास ठेवणार नाही; मी तर त्यांचा बंदिवास उलटवीन व त्यांच्यावर दया करीन.”


बाबेलवर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलविरुद्ध जी वचने लिहिण्यात आली होती ती यिर्मयाने एका ग्रंथात लिहून ठेवली होती.


जो इस्राएल देश मी हात उचलून तुमच्या वडिलांना दिला त्यात मी तुम्हांला आणीन तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


मी त्यांना राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशांतून त्यांना जमा करीन; मी त्यांना स्वदेशी परत आणीन; मी इस्राएलाच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ व देशातल्या सर्व वसतिस्थानांत त्यांना चारीन.


कारण मी तुम्हांला राष्ट्रांतून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन.


ह्या देशाचे तुम्हांला सारखे वाटे मिळून तुम्ही येथील वतन पावाल कारण हा देश तुमच्या वडिलांना देईन अशी मी हात वर करून शपथ घेतली आहे; ह्या प्रकारे हा देश तुमचे वतन होईल.


पाहा, त्या दिवसांत मी यहूदा व यरुशलेम ह्यांचा बंदिवास फिरवीन;


तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.


त्या समयी मी तुम्हांला आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन; तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”


त्यावर त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हांला दिसणार नाही.


कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील,


“असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यांतला पाडला जाणार नाही असा चिर्‍यावर चिरा राहणार नाही.”


तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील.


तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील; तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझे अधिक कल्याण करील आणि तुला अधिक बहुगुणित करील.


लोकांना दोष लावून तो म्हणतो, “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;


Lean sinn:

Sanasan


Sanasan