Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्यासन्निध येईल, कारण माझ्यासन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल. तो त्यांच्यामधूनच निघेल जेव्हा मी त्यास जवळ येऊ देईन आणि जेव्हा तो माझ्याजवळ येईल. कारण जो माझ्याजवळ यायला कोणाची हिंमत आहे? हे परमेश्वराचे निवेदन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्यांना त्यांच्या स्वजनापैकीच राजा पुन्हा लाभेल; त्यांचा शासनकर्ता त्यांच्यामधून उभारल्या जाईल. मी त्याला माझ्या निकट आणेन आणि तो माझ्या निकट येईल, कारण माझ्या निकट येण्यासाठी त्याने स्वतःस मला समर्पित केले पाहिजे ना?’ असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:21
53 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;


मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.”


तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”


यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.


जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे :


तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या ह्यांना यरुशलेमेचे अधिकारी नेमले; हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगत असे.


तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.


त्याची संतती सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन स्वर्गाच्या दिवसांप्रमाणे अक्षय राहील असे करीन.


देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.”


अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”


तर परमेश्वर त्यांचा देव ह्याची आणि जो त्यांचा राजा दावीद मी त्यांच्यासाठी स्थापीन त्याची ते सेवा करतील.


त्या दिवसांत व त्या समयी दाविदाला नीतिमत्तेचा एक अंकुर फुटेल असे मी करीन, त्या देशात न्याय व नीतिमत्ता चालवील.


पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


पाहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल; पण मी त्यांना त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन; ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल, त्या सर्वांचा एकच मेंढपाळ होईल; ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्यांप्रमाणे वर्ततील.


यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल.


ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये.


मग तो कोरह व त्याचे साथीदार ह्यांना म्हणाला, “परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल; ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल.


“यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”


त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला; तो असा : “हा यहूद्यांचा राजा येशू आहे.”


आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’


ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?”


त्याने इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.


तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.


तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपल्यावर राजा नेमावेस; आपल्या भाऊबंदांतून आपल्यावर राजा नेमावास; तुझ्या भाऊबंदांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नयेस.


मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील.


लोकांचे प्रमुख एकत्र जमले, इस्राएलाचे वंश एकवटले, तेव्हा तो यशुरूनामध्ये राजा झाला.


हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि [स्वतः आमच्या] पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या ‘उजवीकडे बसला.’


आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan