Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 30:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल, कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, पण त्यात घट होऊ देणार नाही; मी त्यांना प्रतिष्ठित करेन, पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 30:19
39 Iomraidhean Croise  

त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यांना आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातांना जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यांना अनुकूल केले होते.


नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.


जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यांत राहिला; नूनाचा पुत्र येशूवा ह्याच्या काळापासून ह्या दिवसापर्यंत इस्राएल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला.


देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाची मुक्ती येवो. देव आपल्या लोकांचे दास्य उलटवील तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.


त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहेस.


तू राष्ट्रांची वाढ केली आहेस, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहेस; तू आपला महिमा दाखवला आहेस; तू देशाच्या चतुःसीमा वाढवल्या आहेत.


येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.


मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.


परमेश्वराने उद्धरलेले जन परततील व जयजयकार करत सीयोनेस येतील; त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील; त्यांना आनंद व उल्लास प्राप्त होईल; दुःख व उसासे पळ काढतील.


पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.


यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.


पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.


ह्यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, रात्री प्रकाश देण्यास तुला चंद्राची गरज लागणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझा देव तुझे तेज होईल.


जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.”


खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्यारुप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे.


यहूदाच्या नगरांतून, यरुशलेमेच्या परिसरातून बन्यामीन प्रांतांतून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पण करतील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतील.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल त्या काळी ‘परमेश्वराच्या कराराचा कोश’ असे ते ह्यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांना तो आठवणारही नाही, ते त्याची खंत करणार नाहीत, आणि तो पुन्हा बनवणार नाहीत.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी इस्राएलाच्या घराण्यात व यहूदाच्या घराण्यात मनुष्यबीज व पशुबीज पेरीन.


हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्‍यांनी भूषित होशील व उत्सव करणार्‍यांबरोबर नृत्य करशील.


आकाशसैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद ह्याची संतती व सेवा करणारे लेवी ह्यांना मी बहुगुणित करीन.”


प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्राएल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल; कळपाप्रमाणे मी त्यात माणसांची वृद्धी करीन.


मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले.


आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये स्थापीन.


मी शीळ घालून त्यांना जमा करीन; कारण मी त्यांना सोडवून घेतले आहे; त्यांची पूर्वी वृद्धी झाली तशी ते वृद्धी पावतील.


त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमनिवाशांचे रक्षण करील; त्या दिवशी त्यांच्यातला निर्बल दाविदासमान होईल; व दाविदाचे घराणे देवासमान म्हणजे अर्थात त्यांच्या अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल.


तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांती ह्यांची आवड धरा.


तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे;


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan